बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आज  दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांबरोबर कोणतीही बैठक करणार नाहीत. असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायावती आज (सोमवारी) विरोधी पक्ष नेत्यांबरोबर बैठक करणार असल्याच्या बातमीनंतर बसपाकडून ही माहिती देण्यात आली. बसपा नेते सतिशचंद्र मिश्रा यांनी एएनआयला ही माहिती दिली आहे. याअगोदर काही माध्यमांनी  २३ मे रोजी असलेल्या लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मायावती दिल्लीत ‘यूपीए’च्या अध्यक्ष  सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्याबरोबर बैठक करणार असल्याची बातमी दिली होती.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी लखनऊ येथे शनिवारी मायावतींची भेट घेतली होती. यानंतर रविवारी विविध माध्यमांचे देशभरातील निवडणुकांनतरचे एक्झिट पोल जाहीर झाले. ज्यामध्ये केंद्राची सत्ता पुन्हा एनडीए प्रणीत भाजपा सरकारकडेच जाणार असल्याचे दाखवले गेल्याने, नव्या राजकीय डावपेचांना सुरूवात झाल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayawati will not be holding any meetings with leaders of opposition today
First published on: 20-05-2019 at 09:10 IST