मागील अनेक दिवसांपासून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती बिघडल्याची चर्चा आहे. अशातच आता ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय ६ च्या (MI6) प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो, असा दावा केलाय. त्यांच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे. रशियाने युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या मृत्यूची बातमी लपवण्यासाठी या काळात पुतीन यांच्या बहुरुप्याचा (बॉडी डबल) वापर केला जात असल्याचाही आरोप होतोय. याबाबत ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने ‘द डेली स्टार’च्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती गंभीर झाल्याचं बोललं जात आहे. सर्वात शेवटी युक्रेनसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतीन माध्यमांमध्ये दिसले होते. मात्र, त्यावेळी त्यांचा चेहरा फुगलेला दिसल्याचं बोललं जातंय. अनेक जाणकार ६९ वर्षीय पुतीन यांना रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) झाल्याचाही दावा करत आहेत.

या पार्श्वभूमीवर ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय ६ ने देखील गंभीर आजारामुळे व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला असू शकतो आणि रशियाकडून ही बातमी लपवण्याचा प्रयत्न केला जात असावा, अशी शंका व्यक्त केलीय.

युक्रेनशी तणावानंतर समोर आलेला पुतीन यांचा व्हिडीओ जुना?

गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवटी पुतीन माध्यमांसमोर दिसले तो व्हिडीओ आधीच रेकॉर्ड केलेला जुना व्हिडीओ असू शकतो. रशियाच्या विजय दिनाच्या दिवशी मॉस्कोत दिसलेले पुतीन म्हणजे त्यांचा बहुरुप्या असू शकतो. पुतीन खूप आजारी आहेत आणि त्यांच्या मृत्यूनंतर ही बातमी अनेक दिवस लपवून ठेवली जाऊ शकते.

हेही वाचा : ‘…तर परिस्थिती आणखी बिघडेल’, जर्मनी आणि फ्रान्सच्या नेत्यांना पुतीन यांचा इशारा

दुसरीकडे याचवेळी पुतीन यांचा मृत्यू झाला असू शकतो आणि ती माहिती लपवली जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः पुतीन यांनीच ते आजारी पडले तेव्हा आपल्या बहुरुप्याला नियुक्त केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mi6 chiefs claim vladimir putin may already be dead with body double taking his place pbs
First published on: 29-05-2022 at 19:22 IST