Microsoft software engineer fired : मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्स -बिल्ड २०२५ मध्ये कंपनीचे सीईओ सत्य नडेला यांच्या भाषणात व्यत्यय आणणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला काढून टाकल्याचा प्रकार समोर आले आहे.

जो लोपेझ असे काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने कंपनीच्या गाझा येथील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या इस्त्रायली लष्कराबरोबरच्या भागीदारी संबंधी आक्षेप नोंदवला होता. तो भाषण चालू असताना “फ्री पॅलेस्टाईन” असे ओरडला होता.

“मायक्रोसॉफ्ट पॅलेस्टिनींना कसे मारत आहे हे तुम्ही त्यांना दाखवला का? Azureच्या पाठिंब्याने इस्रायली युद्ध गुन्हे कसे होतात हे तुम्ही त्यांना दाखवणार का?” असे ओरडत असताना सुरक्षा रक्षकांनी लोपेझ याला सिएटल कन्व्हेन्शन सेंटरमधून बाहेर काढले. “मायक्रोसॉफ्टचा एक कर्मचारी म्हणून, मी या नरसंहारात सहभागी होण्यास नकार देतो,” असेही लोपेझ याने ओरडून सांगितलं.

‘नो अझूर फॉप अपार्थेड’ या गटाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार निषेध नोंदवल्यानंतर लोपेझ याला काढून टाकण्यात आल्याचे पत्र मिळाले आहे. मात्र त्याला यासंबंधीचे कागदपत्रे उघडून पाहाता आली नाहीत, असे सांगितले जात आहे.

निषेध व्यक्त केल्यानंतर लगेचच लोपेझने त्याच्या मायक्रोसॉफ्ट मधील इतर सहकाऱ्यांना एक सामूहिक ईमेल पाठवला ज्यामध्ये त्याने गाझामध्ये अझूर क्लाउड सेवांच्या वापराबाबत कंपनीने केलेल्या दाव्यांना खोडून काढले. “गाझामध्ये नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी किंवा त्यांना इजा पोहचवण्यासाठी अझूर तंत्रज्ञान वापरल्याच्या आमच्या दाव्याला नेतृत्व नाकारते,”असे लोपेझने ईमेलमध्ये म्हटले आहे.

आपल्यापैकी जे कोणी याकडे लक्ष्य देत आहेत त्यांना माहिती आहे की हे खोटं आहे. क्लाऊडमध्ये साठवलेला डेटाचा प्रत्येक बाइट (यातील बहुतांश डेटा हा बेकायदेशीरपणे पाळत ठेवून मिळवलेला) हा शहरं नष्ट करणे आणि पॅलेस्टेनियन लोकांच्या नरसंहारासाठी समर्थन म्हणून वापरला जाईल.

चार दिवसांच्या कॉन्फरन्स दरमय्यान पॅलेस्टिनी समर्थकांच्या अनेक निदर्शने केली. यातील ही पहिलीच घटना होती. ही कॉन्फरन्स सुरू असताना किमान तीन एक्झिक्युटीव्ह सेशन्समध्ये आढथळा आणण्यात आला. एका लाईव्हस्ट्रीमचा ऑडिओ थोड्या कालावधीसाठी बंद करण्यात आला इतकेच नाही तर आंदोलक हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या ठिकाणाच्या बाहेर जमले ङोते

अशाच प्रकारच्या एका घटनेत माजी सॉफ्टवेअर इंजिनिअर वानिया अग्रवाल यांच्यासह आणखी एक मायक्रोसॉफ्ट कर्मचारी होस्साम नासर हे कंपनीच्या हेड ऑफ सेक्युरिटी फॉर एआय नेता हायबी यांच्यावर ओरडले होते.

गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टने इस्त्रायली सैन्याला एआय सेवा पुरवल्याचे मान्य केले. पण त्यांनी म्हटले की, अझूर क्लाउड किंवा एआय टूल्सचा वापर गाझामधील नागरिकांना थेट लक्ष्य करणे किंवा इजा पोहचवण्यासाठी केल्याचा कुठलाही पुरावा आढळला नाही. मात्र कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून याला विरोध होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्मचाऱ्यांच्या एका गटाने दावा केला की कंपनीने पॅलेस्टाईन आणि गाझा यासारखे शब्द असलेले अंतर्गत ईमेल ब्लॉक केले आहेत. मायक्रोसॉफ्टने यापूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या त्यांच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अशा प्रकारचा निषेध नोंदवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले आहे.