संयुक्त राष्ट्राच्या महासभेत रशिया-युक्रेन युद्धावर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हे युद्ध मुत्सदेगिरीद्वारे संपवण्यात यावे, असे आवाहन या महासभेत भारताने केले आहे. “या युद्धात भारत कोणाच्या बाजूने आहे हे आम्हाला नेहमी विचारले जाते. यावर आमचे थेट आणि प्रामाणिक एकच उत्तर आहे. भारत शांतीच्या बाजूने असून यावर नेहमी ठाम राहणार आहे”, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या महासभेत म्हणाले आहेत.

“पंतप्रधान मोदींनी रात्री साडेबाराला फोन केला नी विचारलं…”; परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितली अफगाणिस्तान युद्धाच्या वेळीची आठवण

भारत संयुक्त राष्ट्राची तत्वं आणि अधिकारांच्या बाजूने आहे. रशिया-युक्रेनमधील युद्ध संवादामार्फत सोडवणाऱ्यांच्या बाजूने भारत असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहे. या प्रश्नावर संयुक्त राष्ट्र आणि बाहेरील देशांमध्ये रचनात्मक कार्य आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या महासभेत बोलण्यापूर्वी एस जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जे लावरोव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी युक्रेन, जी-२० आणि संयुक्त राष्ट्रामधील सुधारणेवर चर्चा केली.

सुरक्षा परिषदेत एस. जयशंकर यांची चीनविरोधात कडक भूमिका, रशियावरही साधला निशाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत शनिवारी केलेल्या भाषणात जगातील महागाईवर बोट ठेवले. युक्रेनमधील संघर्षामुळे अन्न आणि इंधन महाग झाल्याचे मत जयशंकर यांनी व्यक्त केले. भारताने अलीकडच्या काही वर्षांत अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका, येमेन आणि अन्य देशांना अन्नधान्याचा पुरवठा केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बोलताना जयशंकर यांनी चीनविरोधात अप्रत्यक्ष निशाणा साधला. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याचा अमेरिका आणि भारताचा प्रस्ताव चीनने संयुक्त राष्ट्र परिषदेत रोखला होता. या भूमिकेवर जयशंकर यांनी चीनची कानउघाडणी केली.