‘देवतारी त्याला कोण मारी’ अशी एक म्हण आहे. अनेकवेळा या म्हणीच्या सत्यतेचा प्रत्यय आला आहे. अनेक भीषण अपघातातून प्रवासी बचावल्याची उदाहरणे घडली आहेत. असेच एक उदाहरण मंगळवारी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये दिसले. खासगी प्रवासी बसने ठोकरल्यानंतर दुचाकीवरून निघालेल्या दोन प्रवासी अपघातातून बचावले. त्यांना अपघातामध्ये दुखापत झाली. पण त्यांचा जीव वाचला. या अपघाताचा व्हिडिओ बघितल्यावर ग्वाल्हेरमध्ये नेमके काय घडले, याची प्रचिती येऊ शकते. पाऊस पडल्यामुळे ग्वाल्हेरमधील रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. त्यातच एका खासगी प्रवासी बसने पुढे निघालेल्या दुचाकीला मागून ठोकरले. दुचाकीवरील दोन प्रवासी बसच्या खाली सापडले. त्यानंतर रस्त्यावरील लोकांनी आरडाओरडा केल्यावर बसचालकाने गाडी थांबवली. या अपघात दुचाकीवरील दोन्ही प्रवाशी बचावल्याची माहिती मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miraculous escape for two on a scooty after being dragged under a bus
First published on: 27-07-2016 at 13:04 IST