Fully literate state under ULLAS : सर्वाधिक साक्षरांची संख्या असलेलं राज्य म्हणून केरळकडे पाहिलं जातं. पण संपूर्ण साक्षर राज्य कोणतं असा प्रश्न विचारला तर तुम्ही कोणत्या राज्याचं नाव घ्याल? थांबा…आता हा प्रश्न आता तुम्हाला सतावणार नाही. कारण भारताला पहिलं पूर्ण साक्षर राज्य मिळालं आहे. भारताच्या नकाशावर ईशान्य दिशेला असलेलं मिझोराम हे राज्य पूर्ण साक्षर राज्य ठरलं आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे.
शिक्षण मंत्रालयाने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, आज, ULLAS – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत मिझोरामला अधिकृतपणे पूर्ण साक्षर राज्य घोषित केले जाणार आहे. उल्लेखनीय कामगिरी करणारे भारतातील हे पहिले राज्य ठरले आहे. माननीय शिक्षण राज्यमंत्री आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ऐझॉल येथे होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहतील. मिझोरामचे माननीय मुख्यमंत्री पु लालदुहोमा यांच्यासह इतर मान्यवर ही घोषणा करतील.
बातमी अपडेट होत आहे