केंद्रातील मोदी सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) गव्हर्नरपदाबाबत मोठा निर्णय घेतलाय. शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास यांच्या फेरनियुक्तीला मंजुरी दिलीय. त्यामुळे शक्तीकांत दास पुढील आणखी ३ वर्षे आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करतील. त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी संपत होता. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने त्यांच्या फेरनियुक्तीचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शक्तीकांत दास याआधी अर्थमंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव होते. त्यानंतर त्यांची ११ डिसेंबर २०१८ रोजी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा हाच ३ वर्षांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी संपत आहे. मात्र, या फेरनिुयक्तीने ते डिसेंबर २०२४ पर्यंत या पदावर काम करतील. त्यांनी अर्थविभाग, कर प्रणाली, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

हेही वाचा : रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर, व्याजदर जैसे थे!

शक्तीकांत दास यांनी याआधी जागतिक बँक, आशियन डेव्हलपमेंट बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक, आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँक या ठिकाणी भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणूनही काम केलंय. अर्थमंत्रालयात असताना त्यांनी जवळपास ८ अर्थसंकल्प तयार करण्यात थेट भूमिका निभावलेली आहे. दास यांनी दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलंय.

शक्तीकांत दास यांची उर्जित पटेल यांच्या जागेवर आरबीआयचे गव्हर्नर पदी नियुक्ती झाली होती. उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या स्वायत्तेबद्दल सरकारशी झालेल्या मतभेदांनंतर तडकाफडकी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. यानंतर शक्तीकांत दास यांची नियुक्ती झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi government reappoint shaktikant das as rbi governor for next 3 years pbs
First published on: 29-10-2021 at 08:51 IST