मोदी सरकारचे येत्या निवडणुकीत पानिपत होईल, असे वक्तव्य करून भाजपला घरचा आहेर देणारे ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी घूमजाव केले आहे. मी असे काहीही बोललो नसून वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. डिफिकल्ट डायलॉग या कार्यक्रमात सिन्हा यांनी मोदी यांचे नाव न घेता केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र, रविवारी त्यांनी घूमजाव केले. ते म्हणाले की, माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. भारतीय समाज सर्व काही लक्षात ठेवतो. याचा फटका भविष्यात बसू शकतो. जनता यांनाही धूळ चारेल. केवळ पुढील निवडणुकीपर्यंत प्रतीक्षा करावी. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांना जनतेने धडा शिकविला होता. या परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सिन्हा म्हणाले होते.