अमेरिकेमधील ‘टाइम’ या जगप्रसिद्ध मॅगझिनच्या ‘२०२१ मधील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्तीं’च्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश करण्यात आलाय. मात्र मोदींचा समावेश हा नकारात्मक कारणांसाठी करण्यात आलेला आहे. मोदींचा उल्लेख या यादीमध्ये ज्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे तो उल्लेख मान वाढवणारा नसून देशाच्या प्रतिमेसंदर्भात शंका घेणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘२०२१ मधील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्ती’ या यादीमध्ये उल्लेख ‘भारताला धर्मनिरपेक्षतेपासून दूर लोटणारे आणि हिंदू राष्ट्रवादाकडे ढकलणारे नेते’ असा करण्यात आलाय. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील राजवटीमध्ये ‘भारतामधील मुस्लिमांच्या अधिकारांमध्ये कपात करण्यात आली’ असा आरोपही या लेखात करण्यात आलाय. भारतीय वंशाचे पत्रकार फरीद झकरिया यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचा आढावा घेणार लेख लिहिला आहे. यामध्ये ते लिहितात, “पंतप्रधान मोदींनी पत्रकारांना घाबरवलं, धमकावलं आणि तुरुंगांमध्ये टाकलं. त्यांना असे कायदे आणले ज्यामुळे भारतामधील हजारो बिगर सरकारी संस्था आणि गट कमकुवत झाले.”

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
shivpal yadav
समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बदायूमधून कोणाला मिळणार उमेदवारी?

झकरिया यांनी जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर भारतासाठी पंतप्रधान मोदी हे सर्वात महत्वाचे नेते आहेत असं म्हटलंय. “जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून भारतासाठी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचा मूलभूत साचा तयार केला. इंदिरा गांधी या सुद्धा सर्वात कठीण काळामध्ये सत्तेत होत्या. त्यांच्या काळात झालेली युद्ध, नागरिक आंदोलने आणि आणीबाणी अशा महत्वाच्या घडामोडी घडल्या. या दोघांनंतर सर्वाधिक प्रभावशाली नेते पंतप्रधान मोदीच आहेत,” असाही उल्लेख या लेखामध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यापूर्वीही टाइमच्या या यादीत समावेश करण्यात आलेला होता.

पंतप्रधान मोदींनी आर्थिक निकषांच्या आधारे भारताला कॅपिटलिस्ट म्हणजेच आर्थिक उलाढाली केंद्रस्थानी ठेऊन निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. “त्यांनी भारताला कॅपिटलिझमकडे ढकलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केलाय. मात्र त्याचप्रमाणे त्यांनी देशाला धर्मनिरपेक्षतेपासून दूर लोटत हिंदू राष्ट्रवादाकडे ढकललं आहे,” असं लेखात म्हटलंय.

करोना परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यात आणि नियोजनामध्ये अपयश आल्यानंतरही मोदींची लोकप्रियता कायम असल्याचा उल्लेख लेखात आहे. “अधिकृत आकडेवारीपेक्षा मृतांचा आकडा हा फार अधिक असण्याची शक्यता आहे,” असंही लेखकाने म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अन्य दोन भारतीय व्यक्तींचा या यादीत समावेश असून त्यांचा उल्लेख सकारात्मक पद्धतीने करण्यात आलाय. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि कोव्हिशिल्ड ही करोनारोधक लस बनवणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांचाही १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश आहे.