India Restricts Bangladesh Imports : भारताने एक मोठा निर्णय घेत बांगलादेशला धक्का दिला आहे. बांगलादेशमधून येणाऱ्या काही वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशमधून येणारे कपडे आणि अन्नपदार्थांच्या आयातीवर काही प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्णयाचा फटका बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी काही दिवसांपूर्वी चीनला भेट देत भारताविरोधी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भारताविरोधी केलेली आगळीक बांगलादेशला चांगलीच महागात पडल्याचं बोललं जात आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तब्बल ९ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं होतं. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. मात्र, याचवेळी तुर्कीए आणि अझारबैजानने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. याबाबत भारताने नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाही तर भारतातील नागरिकांनी तुर्किये आणि अझरबैजानच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन देखील केलं होतं. त्यामुळे याचा फटका तुर्किये आणि अझरबैजानच्या पर्यटनाला बसल्याचं पाहायला मिळालं.

त्यानंतर आता भारताने बांगलादेशला देखील चांगलाच दणका दिला आहे. बांगलादेश सरकाचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी भारताविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताने लादलेल्या आयातीच्या निर्बंधानंतर बांगलादेशचा कापड व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताच्या या निर्णयावर आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडून प्रतिक्रिया समोर आली आहे.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार शेख बशीरुद्दीन यांनी यावर भाष्य केलं असून व्यापार निर्बंधांबद्दल भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचा दावा शेख बशीरुद्दीन यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयाबाबत आम्हाला अद्याप अधिकृतपणे माहिती नाही. अधिकृतपणे माहिती मिळाल्यानंतर आम्ही यावर योग्य ती कार्यवाही करू. तसेच जर काही समस्या उद्भवल्या तर दोन्ही देशांकडून सर्व मुद्द्यांवर चर्चा करत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतील”, असं त्यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने कोणत्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लादले?

भारताने बांगलादेशातून रस्ते मार्गाने येणारे तयार कपडे, फळे, फळांच्या चवीचे पेये आणि कार्बोनेटेड पेये, स्नॅक्स, चिप्स आणि मिठाई, कापूस आणि कापसाच्या धाग्याच्या वस्तू, प्लास्टिक आणि पीव्हीसी वस्तू आणि लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी घातली आहे. तसेच याआधी बांगलादेशने भारतातून सूत आयात करण्यावर बंदी घातली होती.