Mohammed Nizamuddin Shot Dead By US Police: तेलंगणातील महबूबनगर येथील एका ३० वर्षीय भारतीय सॉफ्टवेअर इंजीनिअर मोहम्मद निजामुद्दीनचे रूममेटसोबत झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि शेवटी तो कॅलिफोर्निया पोलिसांच्या गोळ्यांचा बळी ठरला.
३ सप्टेंबर रोजी, कॅलिफोर्नियातील सांता क्लारा पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना ९११ हेल्पलाइनवर एका निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची तक्रार प्राप्त झाली. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा मोहम्मद निजामुद्दीन चाकूने त्याच्या रूममेटवर हल्ला करताना आढळला. तेव्हा पोलिसांनी मोहम्मद निजामुद्दीन थेट गोळ्या चालवल्या, ज्यात ताचा मृत्यू झाला.
“जेव्हा अधिकाऱ्याने मोहम्मद निजामुद्दीन पीडितावर चाकू हल्ला करत असल्याचे पाहिला तेव्हा अधिकाऱ्याने त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या आणि त्यातील चारही गोळ्या मोहम्मद निजामुद्दीनल लागल्या. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता”, असे मृत मोहम्मद निजामुद्दीनच्या प्रॉपर्टी मॅनेजरने सांगितले. याबाबत फानान्शिअल एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
हात, छाती, फुफ्फुस आणि पोटावर अनेक ठिकाणी चाकूने वार झालेला पीडित सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, तो आता पूर्णपणे धोक्याच्या बाहेर आहे.
प्रॉपर्टी मॅनेजरने सांगितला घटनाक्रम
मोहम्मद निजामुद्दीन ज्या निवासस्थान राहत होता त्याच्या प्रॉपर्टी मॅनेजरने नाव न छापण्याच्या अटीवर इंडिकाशी बोलताना सांगितले की, घरात चार पुरुष राहत होते, सर्व हायटेक कर्मचारी होते. पण, निजामुद्दीन फेब्रुवारी २०२४ पासून बेरोजगार होता आणि त्याने त्याचा व्हिसा स्टेटस गमावल्याचे वृत्त आहे.
“तो गेल्या चार वर्षांपासून येथे राहत होता. तो त्याचे भाडे वेळेवर देत होता, परंतु अलीकडे तो अनेक समस्यांना तोंड देत होता. तो रागीट होता आणि त्रासदायक होता. आम्ही त्याला या घरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ३ सप्टेंबर रोजी त्याने काहीतरी वेडेपणा केला. यावेळी पोलिसांनी गुन्हेगाराला थांबवले त्यामुळे इतर सर्वाजण वाचले”, असे प्रॉपर्टी मॅनेजर म्हणाला.
शेजाऱ्याने काय सांगितले?
इंडिकाने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद निजामुद्दीच्या घरासमोर राहणारे प्रवीण धीर यांनी या प्रकरणाचा घटनाक्रम सांगितला आहे.
“पोलिस आल्यावर मी जागा झालो. सकाळी ६:३० च्या सुमारास, मला पोलिसांच्या गाड्या दिसल्या. बाहेर दोन गोरे पुरुष त्यांच्या अंडरवेअरमध्ये बसले होते. एकाला दुखापत झाली होती आणि नंतर त्याला रुग्णवाहिकेतून नेण्यात आले, तर दुसरा पोलिसांसोबत होता. अधिकाऱ्यांकडून आणखी एका भारतीय व्यक्तीची चौकशी केली जात होती”, असे प्रवीण धीर म्हणाले.