काश्मीरबाबत डोभाल यांचा गृहमंत्र्यांना अहवाल

१० दिवस काश्मीरमध्ये राहून स्वत: तेथील परिस्थितीवर देखरेख ठेवल्यानंतर परतलेल्या डोभाल यांनी घेतलेली शहा यांची ही पहिलीच भेट होती.

५ ऑगस्टपासून निर्बंध लागू करण्यात आलेल्या जम्मू व काश्मीरमधील सध्याच्या सुरक्षाविषयक स्थितीबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांना माहिती दिली. वाचा सविस्तर..

पूरग्रस्तांना पाठबळ!

कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील पूरग्रस्त भागांतील शेतकरी तसेच नागरिकांना आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा पुन्हा स्वबळावर उभे राहता यावे, यासाठी कर्जमाफीपासून अर्थसाह्य़ापर्यंत विविध उपायांद्वारे खंबीर पाठबळ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. वाचा सविस्तर..

खय्याम यांचे देहावसान

हिंदी चित्रपट संगीतात आपल्या भावोत्कट शैलीचा ठसा उमटविणारे प्रयोगशील संगीतकार खय्याम यांचे दीर्घ आजाराने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. ‘उमराव जान’, ‘बाजार’, ‘नूरी’, ‘कभी कभी’ आदी चित्रपटांतील त्यांची गीते आजही रसिकप्रिय आहेत. वाचा सविस्तर..

राजपूत, राठोड, अमरे अग्रेसर

भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षकपद टिकवणे संजय बांगर यांना कठीण जाणार असल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर फलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत, माजी कसोटी सलामीवीर विक्रम राठोड, अमेरिकेचे फलंदाजीचे प्रशिक्षक प्रवीण अमरे, माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार आणि शितांशू कोटक हे मातब्बर मार्गदर्शक शर्यतीत आहेत. वाचा सविस्तर..

टीबी झाल्याचे आठ वर्षे माहिती नव्हते- अमिताभ बच्चन</strong>

टीबी हा एक असा आजार आहे ज्यावर बोलणं लोकं टाळतात. परंतु बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लोकांना जागरुकतेचा संदेश देत स्वत:ला टीबी झाल्याचा खुलासा केला. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्यासह संवाद साधताना अमिताभ यांनी हा खुलासा केला आहे. ८ वर्षानंतर टीबी झाल्याचे कळाले, असे ते म्हणाले. सर्वांनी टीबीची तपासणी केली पाहिजे, असा मोलाचा संदेशही दिला. वाचा सविस्तर..