राष्ट्रवादीने ‘धरण फोडणारे खेकडे’ पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी सरकारचा निषेध केला आहे

रत्नागिरीतल्या चिपळूमध्ये असलेले तिवरे धरण खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे फुटले असा जावईशोध लावणारे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झालेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आणि आनंद परांजपे यांनी खेकडे पकडून ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिले. हेच ते खेकडे आहेत ज्यांनी धरण फोडले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी उपरोधिक मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी केली. यासंदर्भातले फोटो ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी बेशरम सरकार हा हॅशटॅगही पोस्ट केला आहे. वाचा सविस्तर..
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्ते संजीत शुक्ला यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने कायदेशीर तरतुदी लक्षात घेतल्या नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर..
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस

मुंबईत दोन दिवस थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. रात्रीपासून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर मुंबईतल्या सायन, कुर्ला, अंधेरी, बोरीवली, भायखळा या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. मध्य रेल्वे दहा मिनिटे उशिराने धावते आहे. दक्षिण मुंबईतही पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठाणे, जोगेश्वरी, विक्रोळी या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. वाचा सविस्तर..
अखेरच्या विश्वचषकावर छाप पाडता न आल्याचे गेलला शल्य

वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात तसेच अखेरचा विश्वचषक संस्मरणीय करण्यात अपयशी ठरल्याने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल निराश झाला आहे. मात्र यापुढेही वेस्ट इंडिज क्रिकेटच्या भल्यासाठी सदैव उपलब्ध असेन, असे ख्रिस गेलने सांगितले. वाचा सविस्तर…
चित्र रंजन : सुंदर कथेचा ढेपाळलेला रिमेक

दाक्षिणात्य चित्रपटांचा शब्दश: हिंदी रिमेक हा खरेच गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. एकतर तिथे यशस्वी झालेले चित्रपट पूर्णपणे हिंदीत व्यावसायिक पद्धतीने आणि आपल्या शैलीत हाताळण्याची हातोटी दिग्दर्शकाकडे असायला हवी. तो त्याच साच्यात बसवायचा असेल तरी मुळात दिग्दर्शकाला ती कथा का सांगायची आहे, याबद्दलची तरी स्पष्टता हवी. किंवा चांगले यशस्वी कलाकार, हिट गाणी, अॅक्शन असा फॉम्र्युला तरी जमायला हवा. दिग्दर्शक मंगेश हाडवळे हे फॉर्म्युलाबाज चित्रपट दिग्दर्शकांच्या यादीत मोडतच नाहीत. त्यांचा ‘टिंग्या’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यामुळे हिंदीत ‘मलाल’सारखा चित्रपट ते दिग्दर्शित करणार म्हणजे त्यांच्याकडून वास्तववादी शैलीतील काहीतरी वेगळा चित्रपट अनुभवायला मिळणार हीच अपेक्षा असते. मात्र ‘मलाल’ सगळ्याच पातळ्यांवर निराशा करतो. वाचा सविस्तर…
