कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावर सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे

कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे. ते सोमवारपासून बेपत्ता होते. व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते. वाचा सविस्तर..

डॉक्टरांचा आज संप

लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करीत इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बुधवारी देशभरात बंद पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी देशभरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. या बंदमध्ये राज्यभरातील ४५ हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत. वाचा सविस्तर..

बंदीच्या निर्णयावर पृथ्वी शॉ म्हणतो…

उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे ‘बीसीसीआय’कडून पृथ्वी शॉवर आठ महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पृथ्वीला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर पृथ्वीने ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये पृथ्वीने अनावधनाने चूक झाल्याचे म्हटले आहे. १९ वर्षीय पृथ्वी भारताकडून दोन कसोटी सामने खेळला असून त्याने एक शतक आणि एका अर्धशतकासह २३७ धावा फटकावल्या आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या पृथ्वीने कसोटीत पदार्पणातच शतक झळकावण्याची किमया केली होती. वाचा सविस्तर..

तिहेरी तलाक अखेर रद्द!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अखेर राज्यसभेत तिहेरी तलाकबंदी विधेयक ९९ विरुद्ध ८४ मतांनी मंगळवारी संमत करून ऐतिहासिक विजय मिळवला! वाचा सविस्तर..

‘अमेरिका गॉट टॅलेंट’ नृत्य स्पर्धेत वसई, भाईंदरचे कलाकार उपांत्यपूर्व फेरीत

वसई : नायगाव पूर्वेतील जुचंद्र येथील स्वप्नील भोईर व त्यांच्या “वि अनबिटेबल” डान्स ग्रुपची अमेरिका येथे सुरु असलेल्या “अमेरिका गॉट टॅलेंट ” या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये आपले नृत्य कलेतील कलाकौशल्य दाखवत या तरुणांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. वाचा सविस्तर..

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning bulletin top five news avb 9
First published on: 31-07-2019 at 09:14 IST