समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी आज (सोमवार) करोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला. गुडगावमधील मेदांता रूग्णालायत मुलायमसिंह यादव यांनी लस घेतली आहे. तर, समाजवादी पार्टीने मुलायमसिंह लस घेतानाचा फोटो देखील ट्विट केला आहे. मात्र आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी मुलायमसिंह यांच्या लसीकरणावरून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.

केशवप्रसाद मौर्य यांनी ट्विट करत स्वदेशी लस घेतल्याबद्दल मुलायमसिंह यादव यांना धन्यवाद देखील म्हटले आहे. तसेच, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असे देखील म्हटले आहे की, तुम्ही लस घेणं याचे प्रमाण आहे की, अखिलश यादव यांनी लसीबाबत अफवा पसरवली होती. यासाठी अखिलेश यादव यांनी माफी मागायला हवी.

तसेच, उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी देखील अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मुलायम सिंह यादव यांचा लस घेतानाचा फोटो ट्विट करत, एक चांगला संदेश असं म्हटलं आहे. तसेच, अपेक्षा करतो की समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते व त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आपल्या पक्षाच्या संस्थापकाकडून प्रेरणा घेतील. असं देखील म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? – अखिलेश यादव

सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लसीकरणास विरोध दर्शवला होता. “मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही.” असं अखिलेश यादव यांनी म्हटलं होतं.