सुरतमधील एका तरुणीने केलेला बलात्काराचा आरोप आसाराम बापू यांचा पुत्र नारायण साईने मान्य केला आहे, अशी माहिती सुरत पोलिसांनी बुधवारी दिली. आठवडापूर्वी अटक केलेल्या नारायण साईची पोलिसांनी कसून चौकशी केली असून, या चौकशीत त्याने अनेक गुन्हय़ांची कबुली दिली.
सुरतमधील दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी नारायण साईला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पोलीस चौकशीत नारायणने या तरुणींवर बलात्कार केला नव्हता. त्यापैकी एकीचे माझ्यावर प्रेम होते. आमच्यात सहमतीने शारीरिक संबंध होते, असे सांगितले होते. मात्र बुधवारी त्याने तिच्यावर बलात्कार केल्याची कबुली पोलिसांना दिली. इतरही काही मुलींवर बलात्कार केल्याचेही त्याने मान्य केल्याचे सुरतचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले.
सुरतमधील आश्रमातील आठ सेविकांसोबत नारायण साईचे शारीरिक संबंध होते. त्याचबरोबर जमुना या सेविकेला त्याच्यापासून एक मुलगाही झाला होता, अशी माहितीही त्याच्या चौकशीतून पुढे आली आहे. दिल्ली-हरयाणा सीमेवर दिल्ली पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी नारायण साईला जेरबंद केले होते. बेपत्ता असलेला नारायण साई तब्बल दोन महिन्यांनंतर पोलिसांच्या हाती लागला होता. या काळात तो कुठे होता आणि त्याला पोलिसांना चकवण्यासाठी कोण मदत करत होते, याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्याला बुधवारी स्थानिक न्यायालयाने ५ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
आसाराम बापू आणि नारायण साईने आमच्यावर बलात्कार केल्याचा आरोप सुरतमधील बहिणींनी केला आहे. त्याचबरोबर लैंगिक शोषण, मारहाण आणि बेकायदा डांबून ठेवणे आदी आरोपही त्यांच्यावर करण्यात आले आहेत. 
युवतींना जाळ्यात ओढण्यासाठी नारायण साईचा ‘कोड वर्ड’!
नारायण साईचा विरारमधील आश्रम जमीनदोस्त
कारागृहात नारायण साईला हवी ‘व्हीआयपी’ सेवा

Story img Loader