राज्यसभेच्या नवनिर्वाचित २७ सदस्यांचा काल शपथविधी पार पडला. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या खासदारांशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ सभागृहात नियमित राहावे, सभागृहात तयारी करुन यावे तसेच शब्द जपून वापरावेत, असा सल्ला मोदी यांनी या खासदारांना दिला. राज्यसभेत निवड झालेल्या खासदारांमध्ये नीर्मला सीतारामन, पीयुष गोयल अशा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘ज्यांचं रक्त भगवं ते उद्धव ठाकरेंसोबत,’ शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

शुक्रवारी (८ जुलै) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत राज्यभेसाठी निवड झालेल्या एकूण २७ खासदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी पीयुष गोयल आणि नीर्मला सीतारामन यांच्यासोबतच भाजपाच्या सुरेंद्र सिंग नागर, के लक्ष्मण, लक्ष्मीकांत वाजपेयी आणि कल्पना सैनी आदी नेत्यांनी गोपनीयतेची घेतली. त्यानंतर मोदी यांनी खासदारांना मार्गदर्शन केले आहे. सभागृहात नियमित उपस्थित राहावे, शब्दांची निवड जपून करावी असे मोदी यांनी खासदारांना सांगितले. तसेच यावेळी मोदी यांनी खासदारांना त्यांच्या जबाबदारीचीही जाणीव करुन दिली.

हेही वाचा >>> Video : शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर, हल्लेखोराने गोळ्या झाडल्या अन्…

दरम्यान, महाराष्ट्रातून निवडून आलेल्या भाजपाच्या खासदारांनीही काल गोपनीयतेची शपथ घेतली. यामध्ये पीयुष गोयल, अनिल बोंडे तसेच धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. महाडिक आणि बोंडे यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी हे काही कारणास्तव शपथ घेऊ शकले नाहीत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi advice newly elected rajya sabha mp said use words carefully prd
First published on: 09-07-2022 at 12:03 IST