पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी उना येथे त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मोदी यांनी येथे एका सभेला संबोधित केले. तसेच येथे सामान्य जनतेत जात त्यांच्याशी संवाध साधला. दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या जनतेने मोदींचा जयजयकार केल्याचे पाहायला मिळाले. ‘मोदी-मोदी, शेर आया’ अशा घोषणा यावेळी ऐकायला मिळाल्या.

हेही वाचा >>> HIJAB CASE : शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब घालणं चूक की बरोबर? सर्वोच्च न्यायालयातील दोन्ही न्यायमूर्तींमध्ये मतभेद, वाचा नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यात चौथ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण केले. ही रेल्वे दिल्ली -अंब अंदौरा अशी धावेल. या लोकार्पण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जनतेशी संवाद साधण्याचा मोदी यांनी प्रयत्न केला. यावेळी जनतेने मोदी यांचे हर्षोल्हासात स्वागत केले. मोदी-मोदी, कोन आया कोन आय शेर आया शेर आया, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता.

हेही वाचा >>> काळजावर दगड ठेवून अवघ्या तीन वर्षाच्या मुकबधीर मुलाला ट्रेनमध्येच सोडून गेली आई; चिठ्ठीमध्ये लिहिलं, “माझ्यासाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मोदी यांनी ‘आयआयटी उना’चेही लोकार्पण केले. आयआयटी उनाचे बांधकाम २०१७ साली सुरू करण्यात आले होते. या कामाची पायाभरणीदेखील नरेंद्र मोदी यांनीच केली होती.