नरेंद्र मोदी आपल्या सभांमध्ये लाल किल्ल्याच्या प्रतिकृतींवरून भाषणे करून थकून जातील आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हेच भारताचे पंतप्रधान म्हणून पुढच्या स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करतील असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पोलाद मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केले आहे.
मुझफ्फरनगरचे दंगलखोर गुजरातमधले
काँग्रेस पक्षाने अद्याप अधिकृतरित्या राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित केले नसले तरी, पक्षाच्या बहुतेक नेत्यांनी राहुल गांधींना पसंती दिली आहे. त्यात आता बेनीप्रसाद यांनीही राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त करून काँग्रेसच्या युवाराजांना पाठिंबा दिला आहे.
बोलविता धनी कोण?
त्याचबरोबर मोदी यांचा सामना करण्यासाठी मी एकटा समर्थ आहे. माझ्या पाठीशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आशीर्वाद आहेत असेही बेनीप्रसाद वर्मा म्हणाले.
मुलायमसिंहांचे दहशतवाद्यांशी संबंध
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2013 रोजी प्रकाशित
‘मोदी भाषणच करत राहतील अन् राहुल गांधी पंतप्रधान होतील’
नरेंद्र मोदी आपल्या सभांमध्ये लाल किल्ल्याच्या प्रतिकृतींवरून भाषणे करून थकून जातील आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हेच भारताचे पंतप्रधान म्हणून पुढच्या स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करतील असे

First published on: 03-12-2013 at 06:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi will get tired of making speeches from fake red forts rahul gandhi will be pm beni prasad verma