scorecardresearch

Premium

Chandrayaan 3 मोहिमेवर नासा आणि युरोपियन अंतराळ संस्थांचंही बारीक लक्ष, ‘या’ कामासाठी होतेय मदत

Chandrayaan 3 Landing: इस्रोकडे अंतराळयानाचा मागोवा घेण्यासाठी पुरेशी उपकरणे आहेत. परंतु, चांद्रयान ३ सारख्या दुर्मिळ अंतराळ मोहिमेसाठी ट्रॅकिंगचे जागतिक नेटवर्क असणे आवश्यक आहे.

Nasa and ESA help to chandrayan 3
संग्रहित छायाचित्र

ISRO’s Chandrayaan-3 Moon Landing : अगदी काहीच तासांत चांद्रयान ३ मोहीम शेवटच्या टप्प्यात येणार आहे. चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगसाठी अवघं जग आतूरतेने वाट पाहतंय. भारताची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिम असून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. दरम्यान, ही मोहीम यशस्वी होण्याकरता अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि युरोपिअन स्पेस एजन्सी (ईएसए) यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा >> ‘चंद्रयान-३’चे अवतरण.. नेमके काय होणार?

Bharat Electronics Limited invited application for Trainee Engineer I 47 vacancies The job location is Mumbai
इंजिनीयर उमेदवारांनो ही संधी सोडू नका! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ‘या’ पदासाठी भरती; ४० हजारांपर्यंत मिळणार वेतन
Morning Drinks to Lower Cholesterol Levels
वाईट कोलेस्ट्रॉलच्या समूळ नाशासाठी सकाळी घ्या ‘हे’ पेय; त्रास झटक्यात होऊ शकतो कमी
Delhi Subordinate Services Selection Board recruitment for 567 Multi Tasking Staff post
DSSSB recruitment 2024: डीएसएसएसबीमध्ये ‘या’ पदाच्या ५६७ जागांसाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण तपशील
a traffic police keep his duty in filmy style while controlling traffic on the highway
कर्तव्याला कलेची जोड! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने दाखवला फिल्मी स्टाइल अंदाज, व्हिडीओ होतोय व्हायरल

अंतराळयानाचा मागोवा घेण्यासाठी इस्रोकडे पुरेशी उपकरणे आहेत. परंतु, चांद्रयान ३ सारख्या दुर्मिळ अंतराळ मोहिमेसाठी ट्रॅकिंगचे जागतिक नेटवर्क असणे आवश्यक आहे. कारण, जेव्हा अंतराळयान एस्रो एन्टीनाच्या दृश्याच्या क्षेत्राबाहेर असतं तेव्हा ट्रॅक करणे, नियंत्रण करणे आवश्यक असतं. अशा परिस्थितीत इस्रोला आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थांचीही मदत लागते. म्हणूनच नासा आणि ईएसएने इस्रोला मदत केली आहे.

हेही वाचा >> धाकधुक वाढली! अवघे काही तास शिल्लक, इस्रोमध्ये आता नक्की काय चाललंय? पाहा फोटो

नासाच्या डीप नेटवर्कचा फायदा

नासाचे जगातील सर्वच कोपऱ्यात डीप स्पेस नेटवर्क आहे. तर ईसीएचे स्वतःचे आंतरराष्ट्रीय उपग्रह नेटवर्क आहे. यालाच एस्ट्रॅक म्हणतात. एस्ट्रॅक ही ग्राऊंड स्टेशन्सची जागतिक प्रणाली आहे. नासाची साऊथ पॉइंट सॅटेलाईट स्टेशन, कॅलिफोर्नियामधईल गोल्डस्टोन, फ्रेंच गयानामधील कौरा, स्पेनमधील माद्रिद, युकेमधील गॉनहिली आणि ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे ट्रॅकिंग स्टेशन्स आहेत.

ईएसएकडून ट्रॅकिंग सुरू

ईएसएकडून चंद्राच्या पृष्ठभागावरील ऑपरेशन्ससाठी लँडरला मदत करण्यात येणार आहे. तसंच, रोव्हरने मिळवलेला वैज्ञानिक डेटा भारतात इस्रोकडे सुरक्षितपणे पोहोचवण्यास मदत करणार आहे. अवकाशयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडताच ईएसएने Gonhilly Earth Station द्वारे ऑपरेट केलेल्या अँटेनासह ट्रॅकिंग सुरू केले होते.

हेही वाचा >> चांद्रयान ३ साठी पाकिस्तानच्या माजी मंत्र्याचे ट्वीट, म्हणाले “भारतातील…”

कर्नाटकातील बायलालू या गावात ३२ मीटर खोल अंतराळ ट्रॅकिंग स्टेशन आहे. यामुळे दूरवरच्या अंतराळयातून टेलिमेट्री आणि वैज्ञानिक डेटा शोधणे, ट्रॅक करणे, आदेश देणे आणि प्राप्त केली जातात.

इतर अंतराळ यंत्रणांची गरज का भासली?

एखादं स्पेसक्राफ्ट (अंतराळयान) जेव्हा अँटेनाच्या (पृथ्वी कक्षाच्या) बाहेर जाते तेव्हा त्याचा मागोवा घेण्याकरता इस्रोला इतर स्पेस यंत्रणांची मदत घ्यावी लागते. कारण, जगभरात नवीन महाकाय अँटेना आणि नियंत्रण केंद्रे बांधणे फार खर्चिक असते. म्हणूनच, नासा आणि इतर स्पेस कंपन्या चांद्रयान ३ मोहिमेसाठी व्यावसायिक कंपन्यांप्रमाणे मदत करत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nasa and isa have a key role to play in chandrayaan 3 moon soft landing isro vikram lander sgk

First published on: 23-08-2023 at 16:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×