आता तुम्हाला आपला पृथ्वीग्रह वाचवण्याची संधी चालून आली आहे. कशी तर आपल्या अवकाशात जे लघुग्रह फिरत असतात ते जर पृथ्वीवर आदळले, तर आपण जिथे राहतो ती पृथ्वी नष्ट होऊ शकते, त्यामुळे नासाने असे लघुग्रह शोधण्याची जी मोहीम सुरू केली आहे, त्यात हौशी खगोलनिरीक्षकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. नासाने म्हटले आहे, की असे खगोलनिरीक्षक किंवा नागरिक-वैज्ञानिक आपल्या पृथ्वीला घातक लघुग्रहांपासून वाचवू शकतात.
वैज्ञानिकांच्या मते एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त व्यासाचे ९० टक्के लघुग्रह शोधून काढण्यात आले आहेत, हे लघुग्रह असे आहेत, की जे पृथ्वीवर आदळले तर सगळी पृथ्वीच नष्ट होऊ शकते पण त्याशिवाय ९९ टक्के लघुग्रह असे आहेत, की जे ३० ते ४० मीटर व्यासाचे असून त्यामुळे ग्रह नष्ट होणार नाही पण शहराइतका भाग नष्ट होऊ शकतो व हे लहान लघुग्रह शोधणे बाकी आहे, असे ‘नॅशनल जिऑग्राफिक’ने म्हटले आहे.
नासाने असे सांगितले, की हे छोटे लघुग्रह शोधण्याचे मोलाचे कार्य हौशी खगोलनिरीक्षक करू शकतात. लघुग्रह शोधण्याचा वेग वाढावा एवढीच त्यात आमची अपेक्षा आहे असे नासाचे मुख्य अभियंता ब्रायन मुरहेड यांनी सांगितले. लघुग्रह पकडून ते चंद्राच्या कक्षेत पाठवायचे व नंतर या लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी मानवांना तिथे पाठवायचे अशी एक योजना नुकतीच नासाने जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ आता आता हौशी खगोलनिरीक्षकांना लघुग्रह शोधण्यात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रशियाच्या चेलबिन्सक येथे १८ मीटर लांबीच्या लघुग्रहाचा स्फोट झाला होता त्यानंतर नासाने लघुग्रहांचा प्रश्न गांभीर्याने मनावर घेतला आहे. त्याच दिवशी २०१२ डीए १४ हा लघुग्रह पृथ्वीपासून २८००० कि.मी अंतरावरून गेला होता. त्या लघुग्रहाचा व्यास ३० मीटर होता व एक मोठे शहर नष्ट करण्याची त्याची क्षमता होती. बी ६१२ या लघुग्रहांच्या धोक्याबाबत जागृती करणाऱ्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नासाचे अंतराळवीर एड ल्यू यांनी सांगितले, की पृथ्वीवासीयांना पृथ्वीनिकटच्या लघुग्रहांचा धोका खूप मोठा आहे. त्यासाठी आतापासूनच काळजी घेणे गरजेचे आहे. बी ६१२ फाउंडेशन सध्या लघुग्रह शोधण्याचा प्रकल्प स्वतंत्रपणे हाती घेण्याच्या विचारात असून त्यासाठी सेंटीनेल नावाची दुर्बीण जुलै २०१८ मध्ये अवकाशात पाठवली जाणार आहे. ती साडेसहा वर्षे काम करील.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2013 रोजी प्रकाशित
हौशी खगोलनिरीक्षकांच्या शोधात नासा
आता तुम्हाला आपला पृथ्वीग्रह वाचवण्याची संधी चालून आली आहे. कशी तर आपल्या अवकाशात जे लघुग्रह फिरत असतात ते जर पृथ्वीवर आदळले, तर आपण जिथे राहतो ती पृथ्वी नष्ट होऊ शकते, त्यामुळे नासाने असे लघुग्रह शोधण्याची जी मोहीम सुरू केली आहे, त्यात हौशी खगोलनिरीक्षकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

First published on: 25-06-2013 at 12:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa wants amateur astronomers to track dangerous asteroids