राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू मौप्रिया मित्रा (१५) हिने कोलकाता येथील तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. कोलकात्यापासून ५० किमी अंतरावर असणाऱ्या हुगळी जिल्ह्यात येणाऱ्या मानसपूर येथे ही घटना घडल्याचं वृत्तं ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी सायंकाळी तिला मृतहेद घराच्या सिलिंगला लटकल्याचं आढळून आलं. ज्यानंतर तिचा मृतहेद रुग्णालयात पाठवण्यात आला. ‘मृत तरुणी ही रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या ताणतणावामुळे नैराश्यग्रस्त होती. त्यामुळे आता याविषयीचा पुढील तपास करण्यास सुरुवात केली’, अशी माहिती संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

वाचा : कास्टिंग काऊचच्या मुद्द्याला राईचं पर्वत केलं जातंय- रिचा चड्ढा

२०१६ मध्ये कोलंबो येथे पार पडलेल्या साऊथ एशियन अॅक्वेटिक्स चँपियनशिपमध्ये तिने दोन पदकांची कमाई केली होती. ज्यामध्ये एका सुवर्ण आणि एका रौप्य पदकाचा समावेश होता. सध्या ती इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून, जिम्नॅस्टीक्समध्येही तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण, एका अपघातामुळे तिच्या पायांना दुखापत झाली होती. या अपघाताने खचून न जाता तिने जलकरणाचं प्रशिक्षण घेत याच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती. दरम्यान, तिच्या मृतदेहापाशी कोणत्याही प्रकारचं पत्र न सापडल्यामुळे आता तिच्या आत्महत्येविषयीचं गूढ कायम आहे असंच म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National level swimmer allegedly commits suicide in bengal she was 15 moupriya mitra
First published on: 01-05-2018 at 12:42 IST