scorecardresearch

बजेटच्या अगोदरच दिलासा! ; व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत ९१.५० रुपयांनी कमी

जाणून घ्या, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीची काय आहे परिस्थिती?

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

आजच्या अर्थसंकल्पापूर्वीच सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत ९१.५० रुपयांनी कमी झाली आहे.

Budget 2022 Live: एलआयसीचा आयपीओ बाजारात येणार – निर्मला सीतारामन

आज(मंगळवार) तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ९१.५० रुपयांची कपात केली आहे. या कपातीमुळे आता दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडर १९०७ रुपयांचा झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत १०२.५० रुपयांनी कपात केली होती, मात्र सिलिंडरची किंमत २००० रुपयांपेक्षा जास्त होती.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर –

आज (१ फेब्रुवारी) सकाळी दिल्लीत विना सबसिडीवाल्या १४.२ किलोच्या इंडेन गॅस सिलिंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. कोलकातामध्ये गॅस सिलेंडरची किंमत ९२६ रुपये आहे. मुंबईत, घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत सध्या ९१५.५० रुपये आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: National oil marketing companies have reduced commercial 19kg lpg cylinder cost by rs 91 msr

ताज्या बातम्या