राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी संबंधित प्रमुखांना पत्र पाठवलं असून ते व्हायरल झालं आहे. यासोबत त्यांनी ट्विट करत अधिकृतपणे निर्णयाची माहिती दिली आहे. दरम्यान हा निर्णय महाराष्ट्र आणि इतर कोणत्याही राज्यातील पक्ष संघटनेला लागू होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

“शरद पवारांनी शेवटी डाव साधला, आमची शिवसेना…”, पक्षफुटीवर बोलताना रामदास कदम यांचा गंभीर आरोप!

ट्विटमध्ये काय म्हटलं आहे –

“अध्यक्ष शरद पवारांच्या संमतीने पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल तात्काळ बरखास्त करण्यात येत आहेत. यामधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युथ काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला वगळण्यात आलं आहे”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीट करत दिली आहे.

दरम्यान यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी हा निर्णय महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही राज्यातील पक्ष संघटनेला लागू होणार नाही असंही स्पष्ट केलं.

प्रफुल्ल पटेल यांनी ट्वीटमध्ये कुठेही या निर्णयामागील कारणाचा उल्लेख केलेला नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्याच्या तीन आठवड्यांनंतर शरद पवारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

ओबीसी आऱक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत

“सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवालातील शिफारशी स्वीकारून ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास आज मान्यता दिली. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई महाराष्ट्राने आज जिंकली याचे समाधान वाटते,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी ट्विट करत दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे आरक्षण टिकावे यासाठी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वाने प्रामाणिक प्रयत्न केले आणि आज त्याची परिणती या निर्णयात दिसली. मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करत राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. ओबीसी समाजासोबत आम्ही नेहमीच असून त्यांच्या उन्नतीप्रतिची बांधिलकी कायमच राहील, याचा पुनरुच्चार या निमित्ताने करतो,” असंही यावेळी ते म्हणाले.