काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, हा दावा खोडून काढणारा एक फ्रेंच अहवाल समोर आल्याने नेताजींच्या मृत्यूबाबतचे गूढ आणखी वाढले आहे. या फ्रेंच अहवालानुसार नेताजींचा १८ ऑगस्ट १९४५ रोजी झालेल्या विमान अपघातात झालाच नव्हता. ते १९४७ पर्यंत जिवंत होते, या अहवालात म्हटले आहे. फ्रेंच सरकारच्या नॅशनल अर्काईव्हजमध्ये ११ डिसेंबर १९४७ रोजी हा अहवाल जमा करण्यात आला होता. पॅरिसस्थित इतिहासकर जे पी बी मोर यांनी या अहवालाच्या आधारे काही धक्कादायक दावे केले आहेत. त्यांच्या माहितीनुसार, तैवान येथे झालेल्या विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. याशिवाय, डिसेंबर १९४७ पर्यंत त्यांचा ठावठिकाणा माहिती नव्हता, असेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे तोपर्यंत नेताजी सुभाषचंद्र जिवंत होते, असे या अहवालातून प्रतित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेताजींच्या मृत्यूबाबत केंद्र सरकारने दिलेली माहिती धक्कादायक: ममता बॅनर्जी

दरम्यान, भारत सरकारच्या दाव्यानुसार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १९४५ मध्ये विमान अपघातातच मृत्यू झाला होता. कोलकाताच्या एका व्यक्तीने माहिती अधिकारांतर्गत गृह मंत्रालयाला नेताजींच्या मृत्यूबाबत माहिती मागितली होती. विविध समितींच्या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला असल्याचे सरकारचे म्हणणे असल्याचे गृहमंत्रालयाने आपल्या उत्तरादाखल म्हटले होते. मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शाहनवाज समिती, न्या. जी. डी. खोसला आयोग आणि न्या. मुखर्जी चौकशी आयोगाच्या अहवालांचा सरकारने अभ्यास केला होता. त्याचबरोबर नेताजी हे ‘गुमनामी बाबा’या वेषात राहत होते, हा दावा सरकारने फेटाळला होता. मात्र, नेताजींचे पणतु आणि भाजप नेते चंद्र बोस यांनी यावर आक्षेप घेत सरकारने नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचे सत्य जाणून घेण्यासाठी विशेष तपास समिती गठीत करण्याची मागणी त्यांनी केली होती.

नेताजी फाइल्स : एका षड्यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netaji subhas chandra bose did not die in air crash says secret french report
First published on: 16-07-2017 at 14:41 IST