ग्रहांप्रमाणेच सूर्यमालेचाच सदस्य असलेले धूमकेतू हे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. सूर्याच्या भोवती लंबवर्तुळाकार प्रवास करणारे अनेक धूमकेतू असून ते ठराविक कालवधीनंतर सूर्याला वळसा घालत असतात. यापैकी काहीच धूमकेतू हे आत्तापर्यंत माहित झाले असून अनेक धूमकेतू अज्ञात आहेत, काही धूमकेतूंचे अस्तित्व तर सूर्याच्या जवळ जातांनाच लक्षात येते. यापैकीच एक धूमकेतू म्हणजे C/2023 P1 Nishimura. हा धूमकेतू सध्या पृथ्वीपासून दूर आहे. असं असलं तरी पृथ्वी ज्या कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते ती कक्षा ओलांडत त्याने सूर्याजवळून जाण्यासाठी प्रवास सुरु केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या धूमकेतूचा शोध जपानमधील हौशी खगोल अभ्यासक हिदेओ निशिमुरा यांनी काही दिवसांपूर्वीच म्हणजे ११ ऑगस्टला लावला. त्यांनी शोध लावला म्हणून त्यांच्या नावावरुन या धूमकेतूला C/2023 P1 Nishimura असे नाव आता देण्यात आले आहे. तेव्हा आता जगभरातून या नव्या धूमकेतू बद्दल निरिक्षणे सुरु झाली आहेत. याचा नेमका आकार अजुनही समजू शकलेला नाही. सूर्याच्या जवळ जात असल्याने उष्णतेमुळे या धूमकेतूच्या शेपटाचा पसारा आणखी वाढणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New comet c 2023 p1 nishimura going to visible in september with naked eyes asj
First published on: 19-08-2023 at 16:48 IST