डीआरडीओकडून मान्यता मिळालेलं २ डायोक्सी डी ग्लुकोज हे करोना प्रतिबंधक औषध पूर्णपणे सुरक्षित असून त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते, असं मत वैज्ञानिक ड़ॉ. सुधीर चंदना यांनी आज व्यक्त केलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या इन्स्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसीन अँड अलाईड सायन्सेस या प्रयोगशाळेने हैद्राबादच्या डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेच्या संयुक्त विद्यमाने हे औषध तयार करण्यात आलं आहे. डॉ. चंदना हे याच प्रयोगशाळेत काम करणारे वैज्ञानिक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे औषध करोना रुग्ण बरे होण्यामध्ये परिणामकारक ठरत असल्याचं या औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांमधून समोर आलं आहे. चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यात ११० रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला, तर तिसऱ्या टप्प्यात २२० रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला. नेहमीच्या करोना उपचारांपेक्षा हे औषध वापरुन केलेले उपचार अधिक परिणामकारक असल्याचं समोर आल्याची माहिती डॉ. चंदना यांनी दिली आहे.

ते म्हणाले, “या औषधामुळे आत्ताच्या साधारण कालावधीच्या २ ते ३ दिवस आधीच करोना रुग्ण बरा होत आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या दिवशी ४२ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली नाही. तर साधारण परिस्थितीत तिसऱ्या दिवशी ३१ टक्के रुग्ण ऑक्सिजनमुक्त होतात. साधारण उपचारांसोबत हे औषध वापरल्यास रुग्णाची ऑक्सिजनची गरज कमी होत असल्याचं समोर आलं आहे.”

गेल्या वर्षीच्या एप्रिलपासूनच या औषधाच्या चाचण्या सुरु करण्यात आल्या होत्या. मे २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या करण्यात आल्या. यात ११० रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला. या चाचण्यांमधून समोर आलेल्या परिणामांनंतर पुढच्या टप्प्यातली चाचणी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत करण्यात आली. या चाचणीसाठी २२० रुग्णांवर प्रयोग करण्यात आला.

कालच या भुकटी स्वरूपातल्या करोनावरच्या औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांची तातडीच्या वापरासाठी मंजुरी दिली आहे. हे औषध पाण्यातून मिसळून घेता असल्याचंही समोर आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New medicine by drdo is safe to use and it helps covid patients to recover vsk
First published on: 09-05-2021 at 19:22 IST