पेगॅसस या इस्रायली स्पायवेअरच्या कथित वापराबाबत सर्वोच्च न्यायालयात एक नवी याचिका सादर करण्यात आली आहे. न्यू यॉर्क टाइम्सने या संबंधात प्रकाशित केलेल्या वृत्ताची न्यायालयाने दखल घ्यावी आणि २०१७ साली इस्रायलशी झालेल्या संरक्षण व्यवहाराचा तपास करावा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

 २०१७ साली इस्रायलशी झालेल्या २ अब्ज डॉलरच्या संरक्षणविषयक व्यवहाराचा भाग म्हणून भारताने पेगॅसस स्पायवेअर खरेदी केले, असा दावा न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तात करण्यात आला होता. या वृत्तानंतर वादाला तोंड फुटले असून, विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे.

Supreme Court verdict on minor abortion
तिसाव्या आठवडयात गर्भपातास परवानगी; अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Calcutta High Court
संदेशखाली प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार; कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आदेश
supreme-court_
मदरसा कायदा रद्द करण्यास अंतरिम स्थगिती; अलाहाबाद उच्च न्यायालयाने चुकीचा अर्थ लावला- सर्वोच्च न्यायालय
chief justice dy chandrachud
‘मी व्हिस्कीचा चाहता’, सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी असं म्हटल्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले…

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील मूळ याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅड. एम.एल. शर्मा यांनी ही याचिका केली आहे. या कराराला संसदेने मंजुरी दिलेली नव्हती व त्यामुळे हा करार रद्द करून, त्याची रक्कम वसूल करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी योग्य ते निर्देश द्यावेत; तसेच जनहितार्थ वादग्रस्त पेगॅसस स्पायवेअर खरेदी कराराचा व जनतेच्या पैशांच्या कथित गैरवापराचा तपास करावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.