दिल्लीजवळच्या गाझियाबाद या ठिकाणी पती-पत्नीच्या मृत्यूमुळे सगळं गाझियाबाद हादरलं आहे. पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं आहे. पतीचा मृतदेह पाहून पत्नीला दुःख अनावर झालं. त्याच आवेगात सातव्या मजल्यावरुन उडी मारुन तिने आयुष्य संपवलं. एक दिवसाच्या फरकाने पती आणि पत्नी दोघांचाही मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

२५ वर्षीय अभिषेक अहलुवालिया आणि २२ वर्षीय अंजली या दोघांचं लग्न तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये झालं होतं. २६ फेब्रुवारीच्या दिवशी दोघंही दिल्लीतल्या प्राणी उद्यानात ते फिरायला गेले होते. तिथे फिरत असताना अभिषेककच्या छातीत दुखू लागलं. यानंतर तातडीने अभिषेकच्या कुटुंबाला हे कळताच त्यांनी तातडीने दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात त्याला दाखल केलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

हे पण वाचा- प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरची पतीने गोळी झाडून केली हत्या; व्हिडिओ व्हायरल

अंजलीने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन संपवलं आयुष्य

अभिषेकचा मृत्यू झाला आणि त्याचं पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आलं. पतीचं पार्थिव पाहून पत्नी अंजलीला ते दुःख सहन झालं नाही. तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारली. त्यानंतर कुटुंबाने तिलाही रुग्णालयात दाखल केलं. मात्र मंगळवारी तिचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह पाहून अंजलीला खूप दुःख झालं होतं. ज्यामुळे सातव्या मजल्यावरुन उडी मारुन तिनेही आयुष्य संपवलं. गाझियाबादच्या या घटनेने सगळेच हळहळले आहेत. NDTV ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.