गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला उडता पंजाब या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात पंजाबमधील एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा न्यायालयाच्या सुनावणींमध्ये अडकण्याची शक्यता आहे.
‘उडता पंजाब’ या चित्रपटातील एक दृश्य वगळण्यासह सुधारित वैधानिक इशारा देण्याचे स्पष्ट करीत चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी हिरवा कंदील दाखवत चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्ड) तडाखा दिला होता. तसेच ४८ तासांमध्ये चित्रपटाला नवे प्रमाणपत्र उपलब्ध करण्याचे आदेशही न्यायालयाने मंडळाला दिले. चित्रपटाची प्रसिद्धी- वितरणावर निर्मात्यांनी कोटय़वधी रुपये खर्च केलेले आहेत, असे नमूद करीत या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी निर्णयाला स्थगिती देण्याची मंडळाची मागणीही उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या सर्व पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ngo moves supreme court challenging the bombay hc order on the film udta punjab
First published on: 15-06-2016 at 12:39 IST