अरुणाचल प्रदेशमधील आमदारपुत्राचा लाजपतनगर येथील दुकानदारांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी शनिवारी येथे पूर्वेकडील विद्यार्थ्यांच्या एका गटाने जोरदार निदर्शने केली.
लाजपतनगरमधील काही दुकानदारांनी निदो तानिया या आमदारपुत्राची त्याच्या केशरचनेवरून टिंगल केली होती. त्याचा राग आल्याने निदो तानिया याने त्यांना जाब विचारला असता निदो याला दुकानदारांनी बेदम मारहण केली. त्यामध्ये निदो मृत्युमुखी पडला.
लाजपतनगर पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या निदर्शकांनी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली. निदो तानिया हा अरुणाचल प्रदेशातील काँग्रेसचे आमदार निदो पवित्र यांचा मुलगा असून त्याला फरहान आणि अक्रम या दोन दुकानदारांनी जबर मारहाण केली.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2014 रोजी प्रकाशित
विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी निदर्शने
अरुणाचल प्रदेशमधील आमदारपुत्राचा लाजपतनगर येथील दुकानदारांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी शनिवारी येथे पूर्वेकडील विद्यार्थ्यांच्या एका गटाने जोरदार निदर्शने केली.
First published on: 02-02-2014 at 02:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nido taniams death youngsters from northeast call off protest after delhi police assures swift action