इन्फोसिसचे सहसंस्थापक व यूएआयडीआयचे अध्यक्ष नंदन निलेकणी व त्यांच्या पत्नी रोहिणी यांनी नॅशनल कौन्सिल ऑफ अ‍ॅप्लाइड इकॉनॉमिक रीसर्च (एनसीएईआर)  या संस्थेला ५० कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
  निलेकणी हे या संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष असून रोहिणी निलेकणी या अघ्र्यम फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. अघ्र्यम ही शाश्वत जल पुरवठा क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. नंदन निलेकणी यांनी सांगितले की, १९५० पासून एनसीएईआर या संस्थेने संशोधनाचे मोठे काम केले असून आर्थिक धोरणे ठरवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. या संस्थेने आणखी चांगल्या प्रकारे देशाला मदत करावी यासाठी रोहिणी व आपण देणगी देण्याचा निर्णय घेतला. निलेकणी हे युनिक आयडेंटीफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष आहेत.