लोकसभा निवडणुकीपूर्वी समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. याला तिसरी आघाडी म्हणता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या नेतृत्त्वाखाली आघाडीत सहभागी होण्यास तयार नसलेल्या राजकीय पक्षांना एकत्र आणून नवी आघाडी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डाव्या पक्षांनी अशी आघाडी तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि संयुक्त जनता दल त्यांना मदत करीत असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये डाव्या पक्षांनी विविध पक्षांशी जागावाटपाबाबत बोलणी सुरू केली आहेत. जातीयवादी पक्षांविरोधात लढणाऱयाच्या दिल्लीमध्ये झालेल्या परिषदेमध्येच आघाडी स्थापनण्यासाठी प्रयत्नांना सुरुवात करण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2014 रोजी प्रकाशित
समविचारी पक्षांच्या आघाडीचे प्रयत्न सुरू – नितीशकुमार
लोकसभा निवडणुकीपूर्वी समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
First published on: 31-01-2014 at 05:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish hints at a new block in par of like minded parties