केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छतेचं पालन केलं जात नाही असं म्हणत आपली खंत व्यक्त केली आहे. हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छतेचं पालन केलं जात नाही असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे नितीन गडकरींनी?

“आपला देश असा आहे की आपल्या देशात हिंदू समाजाची जी मंदिरं आहेत तिथे स्वच्छता नसते. धर्मशाळा चांगल्या नसतात. मी लंडनमध्ये एका गुरुद्वारात गेलो होतो, रोमच्या चर्चमध्ये जाऊन आलो काही देशांमधल्या मशिदीही पाहिल्या तिथलं वातावरण स्वच्छ होतं. ते पाहून मला हे कायमच वाटत होतं की आपली जी श्रद्धास्थानं आहेत ती स्वच्छ असली पाहिजेत. मला जेव्हा यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली तेव्हा मी महाराष्ट्रातल्या देहू-आळंदी पालखी मार्गासाठी १२ हजार कोटींची मान्यता दिली. तुळजापूर, गाणगापूर, माहूर ही जी आपली श्रद्धास्थानं आहेत ती चांगल्या प्रकारे विकसीत करण्यासाठी आम्ही करतो आहोत.” असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

कैलास मानसरोवर मार्गाचं ८० टक्के काम पूर्ण

नितीन गडकरी यांनी सांगितलं की, उत्तराखंडमधील पिथौरागढ येथून निघणाऱ्या कैलास मानसरोवरच्या मार्गाचे ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झालं आहे. पूर्वी नेपाळमधून जावं लागायचं आणि या दरम्यान तापमान उणेमध्ये होते. यामुळे खूप त्रास व्हायचा.

आणखी काय म्हणाले नितीन गडकरी?

प्रकल्पांना होणारा विलंब कमी करण्यासाठी आणि बांधकामांचा खर्च कमी करण्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल अर्थात DPR हा अचूक असला पाहिजे. नितीन गडकरींनी ३१ मे रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. त्यात त्यांनी विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No cleanliness in hindu temples in our country said union minister nitin gadkari scj
First published on: 01-06-2023 at 07:57 IST