हिंदू देव मानववंशशास्त्रीयदृष्ट्या ( Anthropologically ) उच्च जातीतून येत नाहीत, असं वक्तव्य जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाल्या शांतीश्री धुलीपुडी पंडित?

“मानववंशशास्त्रीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर हिंदूंचा एकही देव ब्राह्मण नाही. बरेचसे देव क्षत्रिय आहेत. भगवान शिव हे अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असावे, असा माझा अंदाज आहे. कारण ते एका स्मशानभूमीत सापासह बसले आहेत. ब्राह्मण स्मशानात बसू शकतील, असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की मानवशास्त्रीयदृष्ट्या देव उच्च जातीतून आलेले नाहीत. मग आपण हा भेदभाव करतो. हे अत्यंत अमानवीय आहे.”, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पाहा ; राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला

”मनुस्मृतीने सर्व महिलांना शूद्र म्हणून वर्गीकृत केले आहे, ‘मनुस्मृती’ नुसार सर्व स्त्रिया शूद्र आहेत. त्यामुळे कोणतीही स्त्री ती ब्राह्मण किंवा इतर कोणत्या जातीची असल्याचा दावा करू शकत नाही”, असेही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी राजस्थानमध्ये नुकत्याच एका नऊ वर्षांच्या दलित मुलाला शिक्षकाने मारहाण केल्याच्या घटनेचा संदर्भही दिला. ”पिण्याच्या पाण्यााला हात लावला म्हणून एका नऊ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार अत्यंत अमानवीय होता. एक माणून एक दुसऱ्या माणसाशी असं कसं वागू शकतो? जर भारतीय समाजाला प्रगती करायची असेल तर जातींचे उच्चाटन करणे अत्यंत गरजेचे आहे.”, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – फलटावर झोपलेला पत्नीला उठवून रुळावर फेकले ; पत्नीचा जागीचमृत्यू, 

शांतीश्री धुलीपुडी पंडित या सावित्री फुले पुणे विद्यापीठात राजकारण आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक होत्या. त्यांचं तेलुगू, तमिळ, मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संबंध, संस्कृती आणि परराष्ट्र धोरण याविषयांवरही त्यांचा अभ्यास आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No god is brahmin said jnu vice chancellor in b r ambedkar lecture series in delhi spb
First published on: 23-08-2022 at 09:08 IST