कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. कतारमधील संरक्षण यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. परंतु, भारताने मुत्सद्देगिरीने आपल्या माजी नौदल अधिकाऱ्यांची तिथून सुटका केली आहे. या आठ जणांविरोधात हेरगिरीचा आरोप होता. कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने ताबडतोबब त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. तसेच त्यांच्याविषयीची जी कागदपत्रं होती त्यांची पूर्तताही केली. त्यानंतर या आठही जणांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आली. मात्र आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी सात जण मायदेशी परतले आहेत. दरम्यान, या माजी नौदल अधिकाऱ्यांना भारताच्या मुत्सद्देगिरीने नव्हे तर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने वाचवलं असल्याची अफवा उडाली आहे.

शाहरुख खान सध्या कतारमधील दोहा शहरांत आहे. दोहा येथे आयोजित एफएसी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून शाहरुखला आमंत्रित करण्यात आलं आहे. या दोहा दौऱ्यावेळी शाहरुखने कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसीम अल थानी यांची भेट घेतली. शाहरुख आणि कतारच्या पंतप्रधानांचा फोटोही समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यानंतर समाजमाध्यमांवर अफवा उडाली की, शाहरुखने त्याची ओळख वापरून कतारमधील तुरुंगात असलेल्या भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांना सोडवलं आहे.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
kl rahul
विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारच्या दौऱ्यावर गेले आहेत. तत्पूर्वी भाजपा नेते आणि माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून खळबळ उडवली. स्वामी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, भारताचं परराष्ट्र मंत्रालय कतारच्या शेखांचं मन वळवण्यात अपयशी ठरल्यानंतर मोदी यांनी शाहरुख खान याला याप्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर कतारच्या शेखांनी आपल्या माजी नौदल अधिकाऱ्यांना सोडवण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे मोदी यांनी कतारला जाताना शाहरुख खानलाही आपल्याबरोबर न्यावं.”

दरम्यान, समाजमाध्यमांवरील अफवांबाबत शाहरुख खानच्या कार्यालयाने खुलासा केला आहे. शाहरुखच्या कार्यालयाची व्यवस्थापक पूजा ददलानी हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, कतारमधील भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेच्या प्रकरणाशी सुपरस्टार शाहरुख खानचा काहीही संबंध नाही.

हे ही वाचा >> कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

पूजाने केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मुत्सद्देगिरी आणि स्टेक्राफ्टशी संबंधित गोष्टींवर आपले नेते उत्तम काम करत आहेत. इतर सर्व भारतीय नागरिकांप्रमाणे शाहरुखलाही आपले माजी नौदल अधिकारी परतल्याचा आनंद आहे. शाहरुखने त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.