आसाम सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जोडीदार जिवंत असेपर्यंत दुसरं लग्न करण्यास सरकारनं बंदी घातली आहे. दुसरं लग्न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा सरकारनं दिला आहे. याबद्दल आसाम सरकारच्या कामगार विभागानं आदेश जारी केला आहे.

आदेशात काय?

‘पर्सनल लॉ’नुसार दुसरं लग्न करण्याची परवानगी आहे. पण, नवीन आदेशनुसार पती किंवा पत्नी हयात असल्यास दुसऱ्या लग्नासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा : लग्नाच्या गाठी.. स्वर्गातून थेट जमिनीवर

याबद्दल बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले, “हा कायदा आधीपासूनच लागू होता. पण, अंमलबजावणी कधीच झाली नव्हती. आता हा कायदा लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.”

हेही वाचा : .. पण लग्नच का करतात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विवाहीत असल्याची माहिती लपवून अथवा आपली खरी ओळख लपवून एखाद्या महिलेबरोबर लग्न किंवा संबंध प्रस्थापित केल्यास गुन्हा ठरणार आहे. अशा प्रकरणांमध्ये १० वर्षाची शिक्षा होऊ शकते. याबद्दल केंद्रीय कायदेविषय संसदीन समितीनं एक अहवाल तयार केला आहे. लवकरच विधेयकही आणण्याच्या तयारी केंद्र सरकारनं केली आहे.