scorecardresearch

Ukraine War: “भारताने काय करावं हे त्यांना सांगण्याची…”; UN मधील भारताच्या भूमिकेवरुन फ्रान्सचे खडे बोल

रशिया आणि युक्रेन संघर्षामध्ये भारताची भूमिका तटस्थ राहिली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सभेमधील रशियाविरोधातील प्रस्तावाच्या वेळीही भारत अनुपस्थित राहिला

emmanuel macron And putin
फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी नुकतीच युक्रेन युद्धासंदर्भात पुतिन यांच्यासोबत ९० मिनिटं चर्चा केली (फाइल फोटो)

युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या भारताच्या मुत्सद्देगिरीचीही मोठी परीक्षा सुरु आहे. एकीकडे अमेरिकेकडून रशियाने केलेल्या हल्ल्याला विरोध केला जातोय तर दुसरीकडे मागील अनेक दशकांपासून जागतिक पातळीवर कायम भारतासाठी उभा राहणारा रशिया असा दुहेरी मतप्रवाहामध्ये भारताने अद्याप तटस्थ भूमिका घेतलीय. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) भारताच्या या भूमिकेवरुन वेगवेगळे मतप्रवाह असतानाच फ्रन्सने मात्र भारताच्या या धोरणाची पाठराखण केलीय. केवळ पाठराखण न करता भारताने काय करावं हे इतरांनी सांगण्याची गरज नाही असा टोलाही फ्रान्सने लावगलाय.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांच्यासोबतच्या ९० मिनिटांच्या कॉलनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा धोक्याचा इशारा; म्हणाले, “भविष्यात युक्रेनसाठी…”

मांडलं रोकठोक मत…
फ्रान्सचे भारतामधील राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी भारताच्या भूमिकेसंदर्भात रोकठोक मत व्यक्त केलंय. भारताने काय भूमिका घ्यावी हे कोणीही सुचवण्याची गरज नाहीय असं फ्रान्सच्या राजदूतांनी म्हटलंय. फ्रान्सच्या राजदूतांना संयुक्त राष्ट्रांसमोर रशियावरील निर्बंधासंदर्भातील प्रस्ताव ठेवण्यावरुन हा प्रश्न विचारण्यात आलेला. भारताने काय भूमिका घ्यावी हे त्यांना कोणीही सांगू नये असं म्हणताच भारताने फ्रान्सने मांडलेल्या मदतीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्यास त्याचं आम्ही स्वागत करु.

नक्की वाचा >> Ukraine War: “माझ्यासोबत बसा, आपण अगदी…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना सुचवला ‘युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग’

भारताचं मत महत्वाचं…
भारताचं मत फार महत्वाचं आहे, असंही इमॅन्युएल यांनी म्हटलंय. “त्यांनी त्यांचं हित लक्षात घेत भूमिका घेतली. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोणीही भारताने काय करावं हे त्यांना सांगण्याची गरज नाहीय. संकट दिवसोंदिवस अधिक गंभीर होत असतानाच भारताकडून यासंदर्भात पाठिंबा मिळाल्यास त्याचं आम्ही स्वागत करु. भारताचं मत फार महत्वाचं आहे,” असं इमॅन्युएल यांनी एएनआयशी बोलताना म्हटलंय.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

रशियावरुद्धच्या मतदानाला भारत अनुपस्थित
रशिया आणि युक्रेन संघर्षामध्ये भारताची भूमिका तटस्थ राहिली आहे. ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’असं सांगत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे देशाची भूमिका स्पष्ट केली होती. भारताने हा संघर्ष सुरु झाल्यापासून रशियाने केलेल्या हल्ल्याबद्दल फार थेटपणे कोणतही व्यक्त केलेलं नाही. संयुक्त राष्ट्राच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये भारताने रशियाविरोधातील प्रस्तावावर अनुपस्थित राहत तटस्थ भूमिका घेतली.

नक्की वाचा >> Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

कठीण काळ येणार…
फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी नुकतीच युक्रेन युद्धासंदर्भात पुतिन यांच्यासोबत ९० मिनिटं चर्चा केली. या चर्चेनंतर मॅक्रॉन यांनी ‘युक्रेनमध्ये आणखी कठीण काळ येणार आहे,’ असा इशारा दिलाय. पुतिन यांना संपूर्ण युक्रेन ताब्यात घ्यायचा आहे असं मॅक्रॉन यांनी सांगितल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याने दिलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nobody should say what india should do its voice matters french envoy to india scsg

ताज्या बातम्या