scorecardresearch

Russia Ukraine War : विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारताची युद्धबंदीची मागणी; १२ लाख युक्रेनियन लोकांनी देश सोडला

Ukraine Russia Crisis : पाश्चिमात्य देशांनी कायम युक्रेनला शस्त्रपुरवठा केला आहे, त्याच्या फौजांना प्रशिक्षण दिले आहे, असा रशियाचा आरोप आहे.

Russia Ukraine Crisis : रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी पहाटे युक्रेनमधील झापोरिझ्झ्या अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागली. नजीकच्या एनरगोदर शहराच्या महापौरांनी ही माहिती दिली आहे. युक्रेनच्या काही भागात जोरदार लढाई आणि गोळीबार सुरू आहे. रशियन आणि युक्रेनियन शिष्टमंडळे गुरुवारी ब्रेस्टमध्ये रशियन आक्रमणावर चर्चा करण्यासाठी चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी भेट घेतली.

दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की, जर युक्रेन रशियन सैन्याच्या ताब्यात गेले तर पुढील लक्ष्य बाल्टिक राज्ये असू शकतात. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट चर्चा हाच युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याची घोषणा केली होती. या युद्धाला एक आठवडा झाला आहे. १२ लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पाश्चिमात्य देशांनी कायम युक्रेनला शस्त्रपुरवठा केला आहे, त्याच्या फौजांना प्रशिक्षण दिले आहे आणि युक्रेनचे रूपांतर रशियाविरोधी तटबंदीत करण्यासाठी तेथे तळ बांधले आहेत, असा आरोप लॅवरॉव्ह यांनी केला. यामुळे आपल्या सुरक्षितलेला धोका निर्माण झाल्यामुळेच आपल्याला युक्रेनविरुद्ध कारवाई करणे भाग पडले, असे रशियाचे म्हणणे आहे.

Live Updates

Russia Ukraine War News Live: एका आठवडय़ापूर्वी सुरू झालेल्या रशियाच्या लष्करी आक्रमणात आतापर्यंत २२७ नागरिक ठार, तर ५२५ नागरिक जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे.

19:30 (IST) 4 Mar 2022
१२ लाख युक्रेनियन लोकांनी देश सोडला; UNSC ची तातडीची बैठक

युक्रेन आणि रशियन सैन्यामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान संयुक्त राष्ट्राने धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे. गेल्या एका आठवड्यात युक्रेनमधून १.२ दशलक्ष लोकांनी पलायन केले आहे. या लोकांनी युक्रेन सोडून शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे.

18:31 (IST) 4 Mar 2022
युक्रेनवरील हल्ल्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याबाबत UNHRC मध्ये मतदानात भारत अनुपस्थित

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत रशियाविरोधात बोलण्यापासून भारताने चौथ्यांदा पाठ फिरवली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईची चौकशी करण्याच्या प्रस्तावावरील मतदानातही भारताने भाग घेतला नाही. UNHRC ने युक्रेन विरुद्ध रशियाच्या लष्करी कारवाईची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:08 (IST) 4 Mar 2022
UNHRC ने रशियाला दिला मोठा धक्का; युक्रेनवरील हल्ल्याची होणार उच्चस्तरीय चौकशी

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान झालेल्या उल्लंघनाची उच्चस्तरीय चौकशी तयार करण्यासाठी मतदान घेतल्याचे, एएफपीने म्हटले आहे. यावेळी हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.

16:32 (IST) 4 Mar 2022
रशिया आण्विक दहशत पसरवत आहे – वोलोडिमिर झेलेन्स्की

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्यानंतर रशियावर आण्विक दहशत पसरवल्याचा आरोप केला आहे. झेलेन्स्की यांनी पुतिन यांना चेर्नोबिल आपत्तीची पुनरावृत्ती करायची असल्याचा आरोप केला. रशियन सैन्याने अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला.

16:20 (IST) 4 Mar 2022
रशियन एसयू-२५ विमान पाडले; युक्रेनचा दावा

शुक्रवारी, आणखी एक रशियन एसयू-२५ युक्रेनच्या व्होल्नोवाखाजवळ खाली पाडण्यात आले, असे नेक्टा टीव्हीने म्हटले आहे.

14:55 (IST) 4 Mar 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावलं

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत कोणताही आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण यांनी न्यायालय सरकारला कोणताही आदेश देणार नाही, असे म्हटले आहे. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी उचलण्यात येणारी सर्व पावले, पालकांसाठी हेल्पलाइनची शक्यता इत्यादींबाबत केंद्र सरकारकडून सूचना घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने अॅटर्नी जनरल यांना सांगितले आहे. पूर्ण वाचा.

14:30 (IST) 4 Mar 2022
युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीयांच्या मदतीसाठी त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचं पाऊल, म्हणाले…

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी शुक्रवारी सांगितले की, युद्धग्रस्त युक्रेनमधून परतणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आगरतळा-दिल्ली फ्लाइटच्या विमानभाड्यात ते त्यांच्या पगारातून योगदान देतील. “त्रिपुरातील लोकांचे आशीर्वाद आणि आपुलकीसाठी मी नेहमीच ऋणी आहे. कृतज्ञतेचे विनम्र प्रतीक म्हणून, मी माझ्या पगारातून युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिल्ली-अगरतळा फ्लाइटच्या विमान भाड्यासाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे,” असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

14:27 (IST) 4 Mar 2022
पुतिन यांना मार्गातून हटवल्यानंतरच…”, अमेरिकी सिनेटच्या सदस्याचं खळबळजनक विधान

रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यापासून जागतिक पटलावर वातावरण तणावपूर्ण झालं आहे. अनेक देशांनी रशियाविरोधात युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये १४१ देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात रशियाविरोधी वातावरण तयार होत असून सर्वच देशांचे प्रमुख पुतिन यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान आता अमेरिकी सिनेटचे सदस्य लिंडसे ग्रॅहम यांनी खळबळजनक विधान केलं आहे. पुतिन यांच्या हत्येसंदर्भात त्यांनी केलेल्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पूर्ण वाचा.

13:30 (IST) 4 Mar 2022
युक्रेनवासियांच्या मदतीला मोलोटोव्ह कॉकटेल; काय आहे हे शस्त्र?

बलाढ्य रशियन सैन्याने युद्धाच्या दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच युक्रेनच्या हवाई क्षेत्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पण, हल्ल्यांची तीव्रता वाढवूनही जमिनीवर प्रभुत्व मिळवण्यात ती गतिमानता दिसली नाही. युक्रेनमध्ये शिरकाव करताना रशियन सैन्याला स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. शस्त्रसामग्री हाती नसणारे युक्रेनियन मोलोटोव्ह कॉकटेल अर्थात ज्वलनशील बॉम्बफेकीने शहरांच्या वेशीवर रशियाशी झुंज देत आहेत.

ज्वलनशील घटकाने भरलेली काचेची बाटली, जी हाताने भिरकावल्यास आग लावण्यास पुरेशी ठरते. कठीण पुष्ठभागावर ती आदळली की, क्षणार्धात भडका उडतो. तिला मोलोटोव्ह कॉकटेल म्हणजे …पुढे वाचा.

13:24 (IST) 4 Mar 2022
युक्रेनमधला मोठा अणुऊर्जा प्रकल्प रशियाच्या ताब्यात

रशियन सैन्याने युक्रेनच्या आग्नेय भागात झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतला आहे, स्थानिक प्राधिकरणाने आज सांगितले. रशियन सैन्याने युक्रेन अणुऊर्जा केंद्राच्या हद्दीत प्रवेश केला

13:22 (IST) 4 Mar 2022
UN मधील भारताच्या भूमिकेवरुन फ्रान्सचे खडे बोल

युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या भारताच्या मुत्सद्देगिरीचीही मोठी परीक्षा सुरु आहे. एकीकडे अमेरिकेकडून रशियाने केलेल्या हल्ल्याला विरोध केला जातोय तर दुसरीकडे मागील अनेक दशकांपासून जागतिक पातळीवर कायम भारतासाठी उभा राहणारा रशिया असा दुहेरी मतप्रवाहामध्ये भारताने अद्याप तटस्थ भूमिका घेतलीय.  भारताच्या या भूमिकेवरुन वेगवेगळे मतप्रवाह असतानाच फ्रन्सने मात्र भारताच्या या धोरणाची पाठराखण केलीय. केवळ पाठराखण न करता भारताने काय करावं हे इतरांनी सांगण्याची गरज नाही असा टोलाही फ्रान्सने लावगलाय. पुढे वाचा.

12:49 (IST) 4 Mar 2022
पुतिन यांच्यासोबतच्या ९० मिनिटांच्या कॉलनंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचा धोक्याचा इशारा

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘युक्रेनमध्ये आणखी वाईट काळ येणार आहे,’ असा इशारा दिलाय. मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत फोनवरुन ९० मिनिटं संवाद सादल्यानंतर ही प्रतिक्रिया दिलीय. पुतिन यांना संपूर्ण युक्रेन ताब्यात घ्यायचा आहे असं मॅक्रॉन यांनी सांगितल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याने दिलीय. पुढे वाचा.

12:22 (IST) 4 Mar 2022
“…तर तो युरोपचा शेवट असेल”, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला निर्वाणीचा इशारा!

आज युक्रेनमधील एनरहोदर भागात असलेल्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. या अणुऊर्जा केंद्रावर आग लागली असून त्यामुळे आता इथे स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी यासंदर्भात आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्यानंतर त्यासंदर्भात तातडीचा व्हिडीओ संदेश जारी केला आहे. या संदेशामध्ये झेलेन्स्की यांनी जगाला गंभीर इशारा दिला आहे. “जर या अणुउर्जा केंद्रावर स्फोट झाला, तर तो सर्वांचा शेवट असेल. तो युरोपचा शेवट असेल. संपूर्ण युरोप रिकामा करावा लागेल”, असं झेलेन्स्की म्हणाले आहेत. पुढे वाचा.

12:21 (IST) 4 Mar 2022
हराला चारही बाजूंनी फौजांचा वेढा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडित अन्…; पुतिन म्हणाले..

मारिउपोल या अझोव्ह समुद्रावरील मोठ्या शहराला रशियन फौजांनी चारही बाजूंनी वेढा घातलाय. या शहरामधील वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय. पाण्याचा पुरवठाही थांबवण्यात आला आहे. असं असतानाच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हे युद्ध आम्ही केलेल्या नियोजित प्लॅनप्रमाणेच लढलं जात असल्याचा दावा केलाय. सविस्तर वाचा.

12:05 (IST) 4 Mar 2022
एका मृतदेहाऐवजी विमानात दहा जण बसू शकतात; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

युक्रेनमध्ये रशियाच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्याबाबत भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. कर्नाटकचे भाजपा आमदार अरविंद बेलाड यांनी युक्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या नवीन या वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृतदेह परत आणण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, एका मृतदेहाऐवजी विमानात दहा जण बसू शकतात. पुढे वाचा.

11:58 (IST) 4 Mar 2022
“एका मृतदेहाऐवजी विमानात दहा जण बसू शकतात”; भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

युक्रेनमध्ये रशियाच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्याबाबत भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. कर्नाटकचे भाजपा आमदार अरविंद बेलाड यांनी युक्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या नवीन या वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृतदेह परत आणण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केले आहे. वाचा सविस्तर…

11:31 (IST) 4 Mar 2022
पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे.

11:12 (IST) 4 Mar 2022
गुगलनेही घेतली रशियाविरुद्ध भूमिका; जाहिरातींवर झाला ‘हा’ परिणाम

Google ने गुरुवारी सांगितलं की त्यांनी रशियामध्ये ऑनलाइन जाहिरातींची विक्री थांबवली आहे. ही बंदी सर्चिंग, युट्यूब आणि गुगलशी संबंधित सर्वच प्लॅटफॉर्म्सला लागू होणार आहे. ट्वीटर आणि स्नॅपनेही रशियाविरुद्ध असंच पाऊल उचललेलं आहे. सध्या घडामोडी वेगाने घडत आहेत. आम्ही याबद्दलच्या पुढच्या सूचना योग्य वेळ आल्यावर देऊ, असंही गुगलने सांगितलं आहे.

10:03 (IST) 4 Mar 2022
फ्रान्सकडूनही युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा

रशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीन राष्ट्रांकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र तरीही रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे. या युद्धात आता फ्रान्सने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. फ्रान्स युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करणार आहे.

10:00 (IST) 4 Mar 2022
भारतीय रेस्टॉरंट युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीयांना देतंय मोफत जेवण

महाराजा, बुडापेस्टमधील सर्वात जुने भारतीय रेस्टॉरंट, हंगेरीच्या राजधानीमार्गे युद्धग्रस्त युक्रेनमधून बाहेर काढलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोफत जेवण देत आहे. कुलविंदर सिंग झाम, रेस्टॉरंटचे मालक हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हणाले की, एक धर्माभिमानी शीख असल्याने, त्यांनी त्वरित मोफत भोजन देण्यासाठी लंगर (सामुदायिक स्वयंपाकघर) उघडले. ” त्यांची संख्या एवढ्या वेगाने वाढेल याची मला कल्पना नव्हती. मंगळवारी ३०० विद्यार्थी बुडापेस्टमध्ये दाखल झाले. बुधवारी दुपारी, आम्ही ८०० विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार केले आणि रात्री आणखी १,५०० विद्यार्थी आले.”

09:47 (IST) 4 Mar 2022
युक्रेनमधून आज २१० विद्यार्थी परतले

ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये  अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जात आहे. आज प्रत्येकी २१० विद्यार्थ्यांना घेऊन भारतीय हवाई दलाची दोन विमाने दिल्लीत दाखल झाली. यावेळी या विद्यार्थ्यांचे संरक्षण राज्यमंत्री जय भट्ट यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

09:28 (IST) 4 Mar 2022

दोन दिवसांपूर्वीच रशियन सैन्याच्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

08:42 (IST) 4 Mar 2022
१० लाखांहून अधिक नागरिक युक्रेनबाहेर

रशियाच्या आक्रमणामुळे १० लाखांहून अधिक लोक युक्रेनमधून बाहेर पडले असून, या शतकातील हे सर्वात जलदगतीने झालेले निर्गमन अ्सल्याचे संयुक्त राष्ट्रांनी गुरुवारी सांगितले. दरम्यान, रशियन फौजांनी युक्रेनमधील दुसऱ्या मोठय़ा शहरावरील आणि सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या दोन बंदरांवरील हल्ले वाढवले आहेत. निर्वासितांची ही संख्या लक्षात घेता, युक्रेनच्या लोकसंख्येपैकी २ टक्क्यांहून अधिक लोकांना गेल्या सात दिवसांत देशाबाहेर पडणे भाग पडले आहे. पुढे वाचा.

08:38 (IST) 4 Mar 2022
युक्रेनियन नागरिकांना ब्राझील देणार व्हिसा

ब्राझीलच्या सरकारने गुरुवारी जाहीर केले की ते आपल्या शेजारी देशावर रशियाच्या आक्रमणामुळे प्रभावित युक्रेनियन लोकांना देशाच्या अधिकृत राजपत्रानुसार तात्पुरते व्हिसा आणि निवास परवाने देईल. गुरुवारी, रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझील निर्णय़ावर स्वाक्षरी करणार आहे.

08:18 (IST) 4 Mar 2022
एकही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये ओलीस नाही ; रशियाच्या दाव्याचे भारताकडून खंडन

युक्रेनमध्ये कोणताही भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या सैन्याकडून ओलीस ठेवला नसल्याचा निर्वाळा भारताकडून देण्यात आला आहे. रशियाने याबाबत केलेल्या दाव्यानुसार खारकीव्ह येथील भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सैन्याकडून ओलीस ठेवण्यात असून, त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांना रशियन भूमीत जाऊ देण्यास मज्जाव करण्या येत असल्याचा दावा रशियातर्फे करण्यात आला. त्याचे स्पष्ट शब्दांत भारताने खंडन केले आहे. येथे अडकलेल्या सर्व भारतीयांच्या आम्ही संपर्कात असून, कुणालाही ओलीस ठेवल्याचे वृत्त अद्याप आम्हाला मिळालेले नसल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आले. पुढे वाचा.

08:16 (IST) 4 Mar 2022
भारतीय विद्यार्थी भयग्रस्त ; मायभूमीत येण्यासाठी व्याकूळ

रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला तरी हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी लवकरात लवकर परतण्याचे वेध लागले असून अद्यापही त्यांचा भारतीय दूतावसाशी संपर्क होऊ शकत नाही. येथील सुमी शहरातील सुमी विद्यापीठातील काही विद्यार्थानी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधून आपली व्यथा व्यक्त केली. पुढे वाचा.

08:12 (IST) 4 Mar 2022
सर्वात मोठ्या अणुउर्जा केंद्रावर रशियाचा गोळीबार

रशियन सैन्याने युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकल्प एनरहोदर येथे आहे, नीपर नदीवरील शहर आहे जे देशाच्या वीज निर्मितीच्या एक चतुर्थांश भाग आहे. प्लांटच्या प्रवक्त्याने सांगितले की गोळीबार शुक्रवारी पहाटे सुरू झाला. रशियन सैन्याने गुरुवारी युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या युक्रेनियन शहराच्या नियंत्रणासाठी लढा दिला आणि युक्रेनियन नेत्यांनी नागरिकांना गनिमी युद्ध पुकारण्याचे आवाहन केलं आहे.

07:59 (IST) 4 Mar 2022
रशिया-युक्रेनच्या चर्चेसाठी इस्रायली पंतप्रधानांचे प्रयत्न

रशिया व युक्रेन यांच्यातील आठवडाभराच्या युद्धानंतर युद्धभूमीच्या बाहेर काढून त्यांना चर्चेसाठी एकत्र आणण्याचे आवाहन इस्रायलचे पंतप्रधान करत आहेत. पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी गुरुवारी तेल अवीवमधील एका सायबर तंत्रज्ञान परिषदेत बोलताना हा विषय मांडला. आधीच्याच दिवशी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व त्यांचे युक्रेनी समपदस्थ वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला होता. इस्रायलचे या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. त्याने रशियाच्या आक्रमणाचा निषेध केला असून, युक्रेनला मानवतावादी मदत दिली आहे. मात्र याच वेळी रशियाला संताप येईल अशी भूमिका घेण्याचे त्याने टाळले आहे. सीरियातील लष्करी मोहिमांमध्ये रशिया व इस्रायल हे सहकार्य करत असतात. ‘जमिनीवरील चित्र सध्या वाईट दिसते आहे, मात्र जागतिक नेत्यांनी तातडीने कृती केली नाही तर ते आणखी वाईट होईल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे,’ असे बेनेट यांनी युक्रेनमधील परिस्थितीबाबत बोलताना सांगितले.

एका आठवडय़ापूर्वी सुरू झालेल्या रशियाच्या लष्करी आक्रमणात आतापर्यंत २२७ नागरिक ठार, तर ५२५ नागरिक जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे. यापूर्वी २०१४ साली रशिया समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनी फौजा यांच्यात पूर्व युक्रेनमध्ये झालेल्या लढाईत १३६ जण ठार, तर ५७७ जखमी झाले होते. त्यापेक्षा ताज्या युद्धातील नागरिकांची जीवहानी जास्त आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांच्या कार्यालयाने सांगितले. warआतापर्यंत कळलेले आकडे प्रत्यक्ष आकडय़ांपेक्षा बरेच कमी असावेत, असे या कार्यालयाने मान्य केले. मृतांच्या मोजणीसाठी हे कार्यालय काटेकोर पद्धत वापरते आणि केवळ शिक्कामोर्तब झालेल्या मृत्यूंचीच पुष्टी करते. युक्रेनी अधिकाऱ्यांनी मृत व जखमींचे आकडे यापेक्षा बरेच अधिक सांगितले आहेत.

Web Title: Russia ukraine war daily live updates operation ganga vsk

ताज्या बातम्या