उझबेकिस्तानमध्ये औषध सेवनाने १८ मुलांचा मृत्यू

नवी दिल्ली : नोएडास्थित मेरियन बायोटेक या औषध कंपनीच्या ‘डॉक-१ मॅक्स’ या खोकल्याच्या औषधामुळे उझबेकिस्तानमध्ये १८ मुलांचा मृत्यू झाल्याने या कंपनीने या औषधाचे उत्पादन तात्पुरते थांबविले आहे. या कंपनीच्या कायदेशीर प्रतिनिधीने सांगितले की, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने उझबेकिस्तानच्या घटनेसंबंधी चौकशी सुरू केली असून याप्रकरणी कंपनी संपूर्ण सहकार्य करणार आहे.

उझबेकिस्तानमध्ये खोकल्याचे औषध प्राशन केल्यानंतर १८ बालकांचा उलटय़ा-मळमळ झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. या बालकांचा मृत्यू भारतातील औषधामुळे झाला असल्याचा आरोप उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केल्यानंतर भारताच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात चौकशीला सुरुवात केली आहे. उझबेकिस्तान सरकारच्या आरोपानंतर या औषधनिर्माण कंपनीच्या तपासणीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
DD News Logo changed
‘हे तर सरकारी माध्यमांचे भगवीकरण’, डीडी न्यूजच्या लोगोचा रंग केशरी केल्यानंतर विरोधकांची टीका
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

मेरियन बायोटेक ही कंपनी ‘डॉक-१ मॅक्स’ हे औषध भारतात विकत नाही आणि तिची निर्यात फक्त उझबेकिस्तानला केली जाते, असे उत्तर प्रदेशच्या सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नोएडा येथील कंपनीच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी तपासणी करण्यात आली. या औषधाचे नमुने घेण्यात आले असून चाचणीसाठी चंडिगढमधील प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, असे मांडविया यांनी सांगितले. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था २७ डिसेंबरपासून उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय औषध नियामकाशी नियमित संपर्कात आहे, असेही मांडविया यांनी सांगितले.