केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाचे संचालक आलोक वर्मा यांच्या निवासस्थानाबाहेरुन गुरुवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलेले चार संशयित गुप्तचर खात्याचे कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. आलोक वर्मा यांच्यावर पाळत ठेवली जात नव्हती तसेच हेरगिरी सुद्धा सुरु नव्हती असे गुप्तचर खात्याकडून सांगण्यात आले आहे. इंडिया टुडेने गुप्तचर खात्यातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताब्यात घेण्यात आलेले चारही अधिकारी त्यांची नियमित डयुटी करत होते असे आयबीकडून सांगण्यात आले आहे. चारही जण आलोक वर्मा यांच्या निवासस्थानाजवळ संशयास्पद स्थितीत वावरत होते. आलोक वर्मा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. सीबीआयमध्ये सुरू असलेल्या वादाला वेगळ वेगळं वळण मिळताना दिसत आहे. वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, सीबीआयच्या दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकामेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. केंद्र सरकारने या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तर, आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांच्याकडे प्रभारी संचालकपदाचा कारभार सोपवला आहे. याशिवाय 13 अन्य अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान, आलोक वर्मा यांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणी सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवीली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने सीबीआयच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचं स्पष्ट केलं असून केंद्रीय दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार एसआयटी याबाबत चौकशी करेल असं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not snooping alok verma house ib
First published on: 25-10-2018 at 14:57 IST