पीटीआय नवी दिल्ली : बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन (बिमस्टेक) गटाच्या पाचव्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गटाचे आर्थिक सामथ्र्य वाढवण्यासाठी एक दशलक्ष डॉलर देण्याचा संकल्प जाहीर केला. या गटातील देशांनी मुक्त व्यापार करार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. भारतासह बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड  या गटाचे सदस्य देश आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युरोपमधील सध्याच्या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय स्थैर्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सांगून मोदी म्हणाले, की ‘बिमस्टेक’ गटाच्या देशांनी या पार्श्वभूमीवर अधिक सहकार्य केले पाहिजे. बंगालचा उपसागर हा सुरक्षा, समृद्धी आणि संपर्काचा सेतू झाला पाहिजे. या परिषदेच्या फलिताची इतिहासात सुवर्णाक्षरांत नोंद झाली पाहिजे. ही परिषद दूरदृश्य प्रणालीद्वारे श्रीलंकेने आयोजित केली आहे. श्रीलंका सध्या या ग्रुपचे अध्यक्षपद भूषवत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One million dollars india increase economic strength bimstec narendra modi announcement expectation free trade member countries ysh
First published on: 31-03-2022 at 01:14 IST