लासलगाव घाऊक बाजारपेठेत चालू आर्थिक वर्षांत कांद्याचे दर ७६ टक्क्यांहून अधिक घसरले असून ते प्रतिकिलो ९.५० रुपये इतके झाले आहेत. सप्टेंबर महिन्यांत प्रतिकिलो ४१.३० रुपये इतका दर होता.
नाशिकस्थित ‘एनएचआरडीएफ’नुसार कांदा घाऊक बाजारात ७ रुपये प्रतिकिलो ते १४.२२ रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. खरिपाचे पीक आल्याने पुरवठय़ात वाढ झाली असून त्यामुळे दर घसरत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या वर्षी दर सर्वात कमी असून त्यामध्ये आणखी एक ते दोन रुपये प्रतिकिलो घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने गेल्या ऑगस्ट महिन्यात राजधानीत कांद्याचे भाव ८० रुपये प्रतिकिलो होते. मात्र दर स्थिर ठेवण्यासाठी यंदा सरकारने कांद्याची आयातही केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2016 रोजी प्रकाशित
कांद्याचे दर घसरले; प्रतिकिलो ९.५० रुपये
घाऊक बाजारात ७ रुपये प्रतिकिलो ते १४.२२ रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे

First published on: 03-02-2016 at 02:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion prices dropped in lasalgaon wholesale market