कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेल्या मेळघाटासारख्या भागांमध्ये डॉक्टरांना सक्तीने पाठविण्याबाबतचे ठोस धोरण अद्याप का आखण्यात आले नाही, याचे स्पष्टीकरण मागतानाच कुपोषणाच्या मुद्दय़ाची माहिती आणि त्यासाठी असलेल्या योजनांचा तपशील देणारे संकेतस्थळ तातडीने सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
वास्तविक सप्टेंबरमध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ३१ ऑक्टोबपर्यंत मेळघाटासारख्या भागांमधील रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याबाबत धोरण आखण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप ते आखण्यात आलेले नसल्याचे याचिकादारांच्या वतीने सांगण्यात आल्यावर न्यायालयाने त्याचा खुलासा करण्याचे आदेश सरकारला दिले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2013 रोजी प्रकाशित
कुपोषण : संकेतस्थळ तातडीने सुरू करण्याचे आदेश
कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेल्या मेळघाटासारख्या भागांमध्ये डॉक्टरांना सक्तीने पाठविण्याबाबतचे ठोस धोरण अद्याप का आखण्यात आले नाही,
First published on: 07-12-2013 at 02:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order to immediately start site