जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लिमच कारणीभूत असतात असे वादग्रस्त विधान करुन विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी वादात भर टाकली आहे. ‘आम्ही धर्म परिवर्तन करण्यासाठी नाही तर मनं जिंकण्यासाठी निघालो आहोत,’ असेही ते म्हणाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिंघल यांनी हिंदुत्ववादी संघटनांकडून सुरू असलेल्या धर्मांतराच्या ‘घर वापसी’ मोहिमेची पाठराखण केली आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे युद्धातील आघाडीचे खेळाडू आहेत. पण हिंदू त्याच्यापेक्षा वेगळा आहे, असे सांगून, ‘सध्या जग इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली आहे,’ असे ते म्हणाले. भाजपा तसेच संघ परिवारीतल विविध संघटनांच्या नेत्याकंडून सातत्याने वादग्रस्त विधाने होत असल्याने मोदी सरकारपुढील अडचणींमध्ये वाढ झाली असताना आता सिंघल यांच्या खळबळजनक विधानाने नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2014 रोजी प्रकाशित
जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लिम कारणीभूत- अशोक सिंघल
जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लिमच कारणीभूत असतात असे वादग्रस्त विधान करुन विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी वादात भर टाकली आहे. '

First published on: 21-12-2014 at 04:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our motive is not to convert peoples religion but to win hearts vhp leader ashok singhal