देशातील लोकसभा निवडणुकांना अजून तीन वर्ष बाकी असले, तरी आत्तापासूनच त्यासाठी आडाखे आणि डावपेच सुरू झाल्याचं दिसून येत आहे. एकीकडे पुढील वर्षभरात देशात होणाऱ्या महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधून राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकांची बेगमी करण्यासाठी प्रयत्नशील असतील. तर दुसरीकडे पक्षीय बांधणीवर देखील भर दिला जात असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: काँग्रेसमध्ये वेगवेगळे बदल होताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी पुढील लोकसभा निवडणुका काँग्रेस जिंकेल, असं भाकित वर्तवलं आहे. त्यासाठी त्यांनी अजब फॉर्म्युला देखील सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोव्यामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पी. चिदम्बरम सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. काँग्रेसकडून त्यांची या निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्याच्या सियोलिम भागात पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत असताना चिदम्बरम यांनी काँग्रेसची पुढील रणनीती स्पष्ट केली.

“…यात कोणतीही शंका नाही!”

गोवा विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांचा संबंध जोडत यावेळी चिदम्बरम यांनी काँग्रेसच्या विजयाचं गणित मांडलं. “यामध्ये कोणतीही शंका नाही. आपण २००७ मध्ये गोवा विधानसभा निवडणुका जिंकलो आणि त्यानंतर २००९ मध्ये लोकसभा निवडणुका देखील जिंकलो. २०१२ मध्ये आपण गोव्यात हरलो आणि २०१४ मध्ये आपण केंद्रात देखील हरलो. यावेळी आपण पक्कं केलं आहे की गोवा विधानसभा निवडणुका जिंकायच्याच आणि त्यानंतर लोकसभा निवडणुका देखील आपण जिंकणार”, असं ते म्हणाले.

काही लोकांना ठराविक घटनांमध्येच मानवाधिकाराचं उल्लंघन दिसतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

“२०१७मध्ये जे घडलं, त्यासाठी माफी मागतो”

दरम्यान, यावेळी पी. चिदंबरम यांनी २०१७मध्ये गोव्यात जे काही घडलं, त्यासाठी माफी मागत असल्याचं पक्ष कार्यकर्त्यांसमोर सांगितलं. “ज्यांनी चुका केल्या, त्यांना आपण कदाचित माफ करू. पण आपला झालेला विश्वासघात कधीही विसरणार नाही. त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात कधीही स्थान मिळणार नाही. आपल्याला त्या अपमानास्पद घटनेवर पूर्णविराम द्यावा लागेल. २०१७मध्ये जे घडलं, त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. पण आता आपण ठाम आहोत की तसं पुन्हा घडणार नाही”, असं चिदंबरम यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P chidambaram predicts congress victory in 2024 loksabha elections after goa win pmw
First published on: 12-10-2021 at 14:05 IST