सांगली : सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान यंत्रावरून काँग्रेसची हात निशाणी गायब होणार असून, या वेळी काँग्रेसचे विशाल पाटील कोणती भूमिका घेतात याकडे सांगलीचे लक्ष लागले आहे.

गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी यांच्या आघाडीमध्ये सांगलीची जागा स्वाभिमानीसाठी सोडण्यात आल्याने सांगलीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता. या वेळी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात उबाठा शिवसेनेला सांगलीची जागा मिळाल्यानंतर काँग्रेस निवडणूक मैदानापासून दूरच राहिली. तरीही कार्यकर्त्यांना अखेरपर्यंत सांगलीत काँग्रेसला संधी मिळेल असे वाटत होते. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करणाऱ्या विशाल पाटील यांना काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला नाही. यामुळे मतदान यंत्रावरील काँग्रेसची निशाणी सलग दुसऱ्या निवडणुकीत गायब झाली आहे.

What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
Akola Lok Sabha, Prakash Ambedkar, BJP,
प्रकाश आंबेडकर, भाजप, काँग्रेसमधील तिरंगी लढतीचा फायदा कोणाला ?
Loksabha Election 2024 Hema Malini Ravi Kishan Harish Rawat working in fields
हेमा मालिनींकडून शेतात खुरपणी तर रवी किशन चहाच्या टपरीवर; मतांसाठी कोण काय काय करतंय?
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO

हेही वाचा – काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील यांनी अपक्ष उमेदवारीही दाखल केली आहे. मविआमध्ये आघाडी धर्माचे पालन करण्याचे काँग्रेसने मान्य केले असून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन तसे आश्वासनही दिले आहे. मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारीअर्ज दाखल करण्यास आमदार सावंत जातीने उपस्थित होते. मात्र, काँग्रेसचा एबी फॉर्म मिळणार नाही हे गृहीत धरून विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारीअर्ज दाखल केला आहे.

आता अपक्ष म्हणून मैदानात राहायचे, की आघाडी धर्म म्हणून माघार घ्यायची याचा निर्णय सोमवारपर्यंत पाटील यांना घ्यावा लागणार आहे. ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि विरोधात असलेल्या भाजपचेही लक्ष लागले आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत २२ एप्रिल रोजी दुपारी तीनपर्यंत असून, त्यानंतरच सांगलीतील लढत कशी होणार हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा – केरळमधील ‘व्हायरल’ टीचर अम्मा आहे तरी कोण? काय आहे कम्युनिस्ट पक्षाची रणनीति?

सांगलीत एकास एक लढत होणार असून, विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत, तर एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची चिंता अन्य कोणी करू नये, ते निश्चित आमच्या भूमिकेला पाठिंबा देतील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. स्व. वसंतदादा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात सलोखा होता. तो सलोखा आजही कायम असून, आमचा संवाद अजून सुरू असल्याचे ते म्हणाले.