Pahalgam Terror Attack Highlights : पहलगाम हल्ल्याची तुलना ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी होऊ लागल्यानंतर आता पाकिस्तानविरोधात एखादी लष्करी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दिल्लीतील नॉर्थ व साऊथ ब्लॉकमध्ये दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सूत्रधारांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी दिवसभर बैठकांचा सपाटा लावला. तर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जाहीर भाषणातून जगभरातील दहशतवाद्यांना सूचक इशारा दिला. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणारे आणि त्यासाठी षडयंत्र रचणाऱ्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा करणार असल्याचं मोदी म्हणाले.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पहलगाम मध्ये हल्ला करणारे ७ दहशतवादी होते, त्यापैकी ४ ते ५ जण पाकिस्तानातील होते. त्यांच्या उर्दूच्या लहेजानुसार ते पाकिस्तानातील असल्याचं स्पष्ट झालंय, कारण ती भाषा पाकिस्तानातील एका विशिष्ट भागात बोलली जाते. तर पीर पांजर रेंजमध्ये हे दहशतवादी पळून गेले आहेत.
तर, भारताने आजपासून पाकिस्तानी नागरिकांनी देण्यात येणारी व्हिसा सेवा बंद केली आहे. सध्यस्थितीतील वैध व्हिसा २७ एप्रिलपर्यंत वैध राहतील, तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध राहणार आहेत. व्हिसा अवैध ठरण्याआधीच पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरूवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन संशयित आरोपींचे रेखाचित्र जाहीर केले. तीनपैकी दोन अतिरेकी हे पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अतिरेक्यांची खात्रीशीर माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
Pahalgam Terror Attack Highlights Today 24 April 2025 : पहलगाम हल्ल्यासंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहा
Pahalgam Terror Attack Live: पहलगाम हल्ल्याबाबतची सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपली; लवकरच भूमिका जाहीर होणार
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांचा विचार घेण्यासाठी बोलावलेली बैठक तब्बल दोन तासांनी संपली आहे. या बैठकीबाबत थोड्याच वेळात सरकारकडून भूमिका जाहीर करण्यात येऊ शकते.
सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते गैरहजर, अरविंद सावंत पत्र लिहित म्हणाले...
सर्वपक्षीय बैठकीसाठी अमित शाहांसह अनेक नेते उपस्थित
सर्वपक्षीय बैठकीसाठी अमित शाहांसह अनेक नेते उपस्थित
भारतीय जवानाने चुकून ओलांडली सीमा, पाकिस्तानी लष्कराने घेतलं ताब्यात
२३ एप्रिल रोजी पंजाबच्या फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेला एक सीमा दलातील जवान चुकून सीमा ओलांडून पलीकडे गेला होता. त्याला पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं आहे. त्याला सुरक्षित भारतात आणण्याकरता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
"रेल्वेने गेलेल्या, कधीही विमानात न बसलेल्या लोकांना विमानातून परत आणलं", शिंदे गटाच्या खासदाराच्या विधानाची चर्चा
Pakistan Reply: "ही तर युद्धाची…", भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देताच पाकिस्तानचा जळफळाट
Video: "इथे समस्या काश्मीरची नाही, सुरक्षा व्यवस्थेची आहे", मृत पर्यटकाच्या पत्नीनं थेट सरकारवर डागली तोफ; म्हणाल्या, "तिथे एकही…"
सर्वपक्षीय बैठकीआधी उपस्थित नेत्यांनी दोन मिनिटांचे मौन पाळून पहलगाममधील मृतांना वाहिली श्रद्धांजली
सर्वपक्षीय बैठकीआधी उपस्थित नेत्यांनी दोन मिनिटांचे मौन पाळून पहलगाममधील मृतांना वाहिली श्रद्धांजली
Visa Services To Pakistani National : पाकिस्तानविरोधात भारताचं मोठं पाऊल, व्हिसाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
Visa Services To Pakistani National : पाकिस्तानविरोधात भारताचं मोठं पाऊल, व्हिसाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अबांनींकडून मदतीचा हात; रुग्णालयात मिळणात मोफत उपचार
"२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांच्या मृत्युबद्दल मी रिलायन्स कुटुंबातील सर्वांसोबत शोक व्यक्त करतो. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो. हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांच्या लवकर आणि पूर्ण पुनर्प्राप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. मुंबईतील आमचे रिलायन्स फाउंडेशन सर एचएन हॉस्पिटल सर्व जखमींवर मोफत उपचार करेल. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. त्याचे कोणीही कोणत्याही प्रकारे समर्थन करू नये. दहशतवादाच्या धोक्याविरुद्धच्या निर्णायक लढाईत आम्ही आमच्या माननीय पंतप्रधान, भारत सरकार आणि संपूर्ण देशासोबत पूर्णपणे उभे आहोत." - मुकेश अंबानी, रिलायन्स समूह, अध्यक्ष
Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसींना गृहमंत्री अमित शहांचा फोन, सर्वपक्षीय बैठकीचं दिलं आमंत्रण!
असदुद्दीन ओवैसींना अमित शहांचा फोन, सर्व पक्षीय बैठकीचं दिलं आमंत्रण!
हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सर्व पक्षांना आमंत्रण दिलं पाहिजे, अशी माझी भूमिका होती. तेवढ्यात मला गृहमंत्री अमित शाहा यांचा फोन आला. त्यांनी फोन करून मला सर्वपक्षीय बैठकीला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे मी लवकरात लवकर तिकिट बुक करून तिकडे पोहोचणार आहे - असदुद्दीन ओवैसी
PM Narendra Modi : जाहीर भाषणातून पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना थेट इशारा; म्हणाले, "मी या जगाला सांगू इच्छितो की..."
"दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार", पंतप्रधान मोदींनी मांडली भारताची भूमिका
ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचं कटकारस्थान रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार. शिक्षा त्यांना मिळणारच. आता दहशतवाद्यांना मातीत मिळवण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवाद्यांचं कंबरंडं मोडून टाकणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हल्ल्यातील मृत्यूमुखी नागरिकांना श्रद्धांजली अर्पण
राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने बिहारमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय युवकाचं पाकिस्तानात लग्न, अटारी सीमा बंद केल्याने बेत रद्द; पुढे काय होणार?
भारताने पाकिस्तानावर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यात अटारी सीमा बंद केल्यामुळे पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या भारतीय युवकाला त्याच्या लग्नाचा बेत तात्पुरता रद्द करावा लागतोय.
Asaduddin owaisi : सर्वपक्षीय बैठकीला AIMIM ला आमंत्रण नाही? असदुद्दीन ओवैसींचा संताप; म्हणाले, "आमच्यासारख्या..."
Pahalgam Attack: भारतानं फटकारल्यानंतर पाकिस्तानला आली जाग, पहलगाम हल्ल्याबाबत इस्लामाबादमध्ये उच्चस्तरीय बैठका!
काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी काळाचौकी येथील आंबेवाडी क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी २३ एप्रिलच्या सामन्यात काळ्या फिती बांधल्या होत्या. तसंच, या खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.

Pahalgam Attack : घनदाट जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना शोधताना चकमक, एका जवानाचा मृत्यू; उधमपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
दिल्ली येथील पाकिस्तान उच्चालयासमोर लावलेले बॅरिकेट्स हटवले
दिल्ली येथील पाकिस्तान उच्चालयासमोर लावलेले बॅरिकेट्स हटवले
संतोष जगदाळे यांना अखेरचा निरोप, पत्नी आसावरी जगदाळे यांना अश्रू अनावर
संतोष जगदाळे यांना अखेरचा निरोप, पत्नी आसावरी जगदाळे यांना अश्रू अनावर
सर्वपक्षीय बैठकीला एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार
सर्वपक्षीय बैठकीला एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार
"पहलगाम हल्ला होणार असल्याचे आधीच माहीत होते", दिल्ली पोलिसांना फोन
पहलगाम हल्ला होणार असल्याची आधीच माहिती होती, असा फोन दिल्ली पोलिसांना आला होता. या फोनविषयी अधिक माहिती घेतली असता फोन करणाऱ्याने दारूच्या नशेन माहिती दिली आहे, असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं.
जम्मू काश्मीरमध्ये गोळीबार सुरूच, घनदाट जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील दुडू-बसंतगड भागात गोळीबार सुरू आहे. धोकादायक भूप्रदेश आणि घनदाट जंगलासाठी ओळखला जाणारा हा परिसर भारतीय लष्कराच्या ९ व्या कॉर्प्सच्या अधिकारक्षेत्रात येतो, तर १६ व्या कॉर्प्सच्या ऑपरेशनल सीमेलाही लागून आहे.
Pahalgam Live Updates : पहलगाम हल्ल्यानंतर कुलगाम येथे चकमक
बुधवारी काश्मीरमधील कुलगाम भागात शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना जोरदार गोळीबार करावा लागला आणि त्यानंतर चकमक उडाली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमधील तंगमार्ग परिसराला वेढा घातला होता. शोधमोहिमेदरम्यान पोलिसांवर जोरदार गोळीबार झाल्यानंतर चकमक सुरू झाली. परिसरात अधिक सैन्य पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.
"काश्मीर प्रश्नावर दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा", संजय राऊतांची मागणी
या संकटकाळात सरकार जी भूमिका घेईल किंवा निर्णय घेईल त्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष ठामपणे उभे राहू. यात कोणतेही मतभेद किंवा वेगळी भूमिका घेण्याचं कारण नाही. आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आज दिल्लीला घाईघाईने किती लोक भेटतात हे पाहावं लागेल. पण आमची एकच भूमिका असेल की विरोधी पक्ष जी सूचना करतं त्याचं पालन करणार असाल तर या बैठकीला अर्थ आहे. सगळी अक्कल सत्ताधाऱ्यांकडेच आहे, असं नाही. विरोधी पक्षानेही कधीतरी पक्ष चालवला आहे. सविस्तर चर्चा देशाच्या संसदेत व्हायला आहे. अनेक विषयांवर विशेष अधिवेशन बोलावलं जातं, तसं काश्मिरच्या प्रश्नावर दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावायला हरकत नाही. त्यावर विरोधकांच्या सूचना, राष्ट्राच्या भावना त्याच्यावर चर्चा घडवून देशाच्या, राष्ट्राच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे.