PM Modi High Level Security Meeting Today Live Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. आता काय काय घडतं ते आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ.

Live Updates

पहलगाम हल्ल्याविरोधात भारत आक्रमक, पाकिस्तानला उत्तर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निर्देश, यासह महत्त्वाच्या घडामोडी

08:38 (IST) 30 Apr 2025

पहलगाम हल्ल्यानंतर वैष्णो देवीला जाणाऱ्या यात्रेकरुंचं प्रमाण झालं कमी

काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर वैष्णो देवीच्या यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या घटली आहे. अनेक पर्यटकांनी या हल्ल्यानंतर बुकिंग रद्द केली आहेत. माता वैष्णो देवी श्राईन बोर्डाचे अधिकारी अंशुल गर्ग यांनी सांगितलं की भक्तांची सुरक्षा, सुविधा याची व्यवस्था योग्य प्रकारे पाहिली जाते आहे.ही यात्रा सुनोयिजतपणे सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये यात्रेकरुंची संख्या कमी झाली आहे. आम्ही इथे येणाऱ्या भक्तांसाठी २४ तास कार्यरत आहोत असंही गर्ग यांनी सांगितलं.

08:25 (IST) 30 Apr 2025

'येत्या २४-३६ तासांत भारत लष्करी कारवाई करू शकतो', पाकिस्तानच्या मंत्र्याचा दावा

Pakistan's minister Attatullah Tarar Statement: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सशस्त्र दलाची उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानच्या मंत्र्यांनी हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे. ...सविस्तर वाचा
08:22 (IST) 30 Apr 2025

भारत पाकिस्तानाशी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांची चर्चा, संघर्ष टाळण्याचा सल्ला

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढला आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी याबाबत फोनवरुन चर्चा केली. पहलगाम हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. दोन्ही देशांनी संघर्ष टाळता आला तर बघावं असा सल्लाही दिल्याचं कळतं आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

bhandara bandh on april 29 to protest Pahalgam attack protest march planned

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी २९ एप्रिल रोजी भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले.