मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झकीउर रहमान लख्वी याला तुरुंगातून तातडीने सोडण्याचे आदेश पाकिस्तानमधील न्यायालयाने गुरुवारी दिले. लख्वीच्या स्थानबद्धतेचा आदेश न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे.
लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन कमांडर असलेल्या लख्वीला इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने गेल्या वर्षी १८ डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. मात्र याबाबत भारताने तीव्र निषेध नोंदवल्यानंतर पाक सरकारने त्याला दुसऱ्याच दिवशी सार्वजनिक सुव्यवस्था कायद्याखाली अटक केली होती. लख्वी रावळपिंडी न्यायालयातून सुटका होण्याच्या बेतात असतानाच २००९ साली एका अफगाणी नागरिकाचे अपहरण केल्याच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी त्याला जामीन मिळाला आहे. लख्वीची स्थानबद्धता दुबळ्या आधारावर करण्यात आल्याचे सांगून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या स्थानबद्धतेला स्थगिती दिली होती. सरकारने त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर या आदेशाला स्थगिती देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak court suspends detention order of mumbai attack mastermind zakiur rehman lakhvi
First published on: 09-04-2015 at 03:52 IST